Pathaan Day 3 Worldwide Collection : पठान सिनेमा आला आणि जगभर प्रसिद्ध झाला. अनके वादाच्या भोवऱ्यात अडलेल्या सिनेमा किती चालेल याबाबत सर्वानाच उत्सुकता होती. दरम्यान जगभरात त्याचा डंका वाजत आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी जगभरात 235 कोटींची कमाई केली आहे. तर आता तिसऱ्या दिवशी अंदाजानुसार 600 कोटींपर्यंत याची कमाई जाईल असे सांगितले जात आहे.
पठानची जबरदस्त कमाई
शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आणि पहिल्या दिवशी 106 कोटींची कमाई केली. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे. दरम्यान पठान सिनेमाची जादू दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. दुसऱ्या दिवशी तब्बल 235 कोटींची कमाई केली.
कमाईच्या बाबतीत पठान सिनेमा केजीएफ 2 सिनेमाच्या किती मागे ?
पठाण दोन दिवसांच्या वर्ल्डवाइड कलेक्शन मध्ये KGF 2 च्या मागे आहे. यश स्टारर KGF 2 ने दोन दिवसात जगभरात 300 कोटींचे कलेक्शन केले. त्यामुळे पठान सिनेमा KGF 2 च्या मागे आहे.
पठान बॉलिवूडला तारणारा सिनेमा ठरला
पठानने बॉलिवूडला जीवदान दिले आहे. मोठं मोठे स्टार्स असलेल्या पठान सिनेमामध्ये सर्व मसाला भरलेला आहे. थ्रिल, ऍक्शन, रोमान्स, सस्पेन्सने भरलेल्या पठानने शाहरुख ला देखील तारले आहे.