सध्या पठाण सिनेमा अनेक वादाच्या भोवऱ्यात सापडला. पण असे असले तरी हा सिनेमा चांगला चालला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान आता पठाण चित्रपटाच्या जबरदस्त यशावर कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाने नुकतेच एका कार्यक्रमात पठाणचे कौतुक केले होते आणि म्हटले होते की, चित्रपट चांगला चालला आहे आणि असे चित्रपट सुरूच राहिले पाहिजेत. आता कंगनाने तिच्या ट्विटर हँडलवर पठाणच्या यशाबद्दल एक लांबलचक नोटही लिहिली आहे. त्यांनी लिहिले, पठाण द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करणाऱ्या सर्वांशी मी सहमत आहे, पण कोणाच्या द्वेषावर प्रेमाचा विजय झाला? चला मुद्द्यावर येऊया, तिकीट खरेदी करून कोण चित्रपट यशस्वी करत आहे? होय, हे भारताचे प्रेम आहे जिथे 80% हिंदू राहतात.
हा आपल्या भारताचा आत्मा आहे जो कोणत्याही द्वेष किंवा निर्णयाशिवाय महान आहे, हे भारत प्रेम आहे जे शत्रूंच्या द्वेषावर आणि घाणेरड्या राजकारणावर विजय मिळवते. पण ज्यांना खूप आशा आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की पठाण हा फक्त चित्रपट असू शकतो, पण येथे फक्त जय श्री राम, जय श्री रामचाच नारा गुंजेल.
कंगनाचे ट्विटरवर पुन्हा कमबॅक
कंगना स्पष्टवक्ता म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर ती प्रत्येक मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडते. अनेकदा ती वादात देखील सापडते. आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. कंगनाने या चित्रपटाबाबत लिहिलेल्या पोस्टमध्ये खुलासा केला होता की, हा चित्रपट बनवण्यासाठी तिने तिचे घर गहाण ठेवले आहे आणि नंतर ते पैसे उभे करून चित्रपट बनवला आहे.