शाहरुख खान Shahrukh khan, दीपिका पादुकोण Deepika Padukone आणि जॉन अब्राहम John Abraham हे स्टार असणारा सिनेमा ‘पठाण’ Pathaan Movie हा आज रिलीज झाला. या चित्रपटाचा पहिला शो आता संपला आहे. अनेक वाद विवादामध्ये फसलेला पठाण सिनेमा आता प्रदर्शित झाल्याने अनेकांचे लक्ष सिनेमाच्या कमाईकडे लागले आहे.
आज पहिल्याच दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कामे करेल यांचा अनेकांनी अंदाज लावला आहे.
पठाणच्या रिलीजचा आज पहिला दिवस असून लोकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. अहवाल आणि अंदाजानुसार पठाण पहिल्या दिवशी ६० कोटींचा टप्पा पार करेल असे सांगितले जात आहे. असे झाल्यास पठाण बॉलीवूड मधील सर्वात मोठा ओपनर सिनेमा बनेल.
पठाण आज 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज झाला. पण तो कालच ऑनलाइन लीक झाल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत त्याचा चित्रपटाच्या व्यवसायावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल. दरम्यान यावेळी शाहरुखने चित्रपटाचे प्रमोशन केले नाही, मात्र अनेक वाद आणि राजकीय वादात अडकल्यामुळे या चित्रपटाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही शाहरुख खानच्या ‘पठाण’ने जबरदस्त कमाई करत सर्वच चित्रपटांना मागे टाकले आहे.