Paytm Ban: पेटीएम वॉलेट बंद होणार, आता अश्या प्रकारे करा डिजिटल पेमेंट

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Digital Payments: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बुधवारी (31 जानेवारी) मोठी घोषणा केली. याअंतर्गत रिझर्व्ह बँकेने पेटीएमवर कारवाई करत त्याच्या सर्व सेवांवर बंदी घातली होती, जी 29 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे पेटीएमच्या बँक खातेदारांना अडचणी येणे साहजिक च आहे. याशिवाय युजर्सपेटीएम वॉलेट, एनसीएमसी कार्ड आणि फास्टॅग आदींचा वापर करू शकणार नाहीत. पेटीएमच्या वॉलेट युजर्सबद्दल बोलायचे झाले तर त्यांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे. त्यामुळे आता या युजर्सकडे कोणता पर्याय असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते कोणत्या प्रकारे डिजिटल पेमेंट करू शकतील?

आदेश काय आहे?
आरबीआयने 31 जानेवारी रोजी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले होते, ज्यामध्ये 29 फेब्रुवारीपासून पेटीएमच्या सर्व सेवा बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पेटीएमच्या वॉलेट युजर्सना सर्वात मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, आकडेवारी पाहिली तर 2018 मध्ये जवळपास तीन कोटी लोक पेटीएमच्या वॉलेटमधून पैश्यांची देवान घेवाण करत होते आणि आतापर्यंत त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आता अनेकांना डिजिटल पेमेंटसाठी इतर पर्यायांकडे वळावे लागणार आहे.

युजर्स या पर्यायांचा वापर करू शकतात
दैनंदिन कामादरम्यान डिजिटल पेमेंटसाठी पेटीएमच्या वॉलेटवर बंदी घालण्यात येणार असली तरी युजर्स इतर माध्यमातून डिजिटल पेमेंट अगदी सहजपणे करू शकणार आहेत. वॉलेटबद्दल बोलायचे झाले तर युजर्सकडे फोनपे, गुगल पे, अॅमेझॉन पे सारख्या वॉलेटची सुविधा आहे, जेणेकरून ते आरामात पेमेंट करू शकतील.

बँकेच्या अॅपवरूनही तुम्ही पैसे भरू शकता
जर युजर्सला पेटीएमऐवजी इतर कोणतेही पेमेंट अॅप वापरायचे नसेल तर ते आपल्या बँक खात्यासह अॅपवरून पेमेंट देखील करू शकतात. एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीएफसी, येस बँकेसह सर्व बँका देखील त्यांच्या अॅपमध्ये स्कॅनरचा पर्याय देतात, जेणेकरून वापरकर्ते कोणताही क्यूआर कोड स्कॅन करून पैसे भरू शकतात.