Pension Scheme : वेगवगळ्या राज्यांतील शासन विविध कल्याणकारी योजना आणत असते. प्रत्येक राज्यात शेतकऱ्यासांठी, वृद्धांसाठी विविध योजना राबवते. दरम्यान आता ज्येष्ठ नागरिकांसाठी अशीच एक पेन्शन योजना उत्तर प्रदेश सरकार चालवत आहे.
या सरकारी योजनेत राज्य सरकारच्या वतीने दरमहा पेन्शन दिली जाते. विशेष म्हणजे या योजनेत तुम्हाला एक रुपयाही गुंतवण्याची गरज लागत नाही. उलट सरकारच तुम्हाला पेंशन देते. यूपी सरकारच्या या पेन्शन योजनेविषयी जाणून घेऊयात-
कोणाला दिली जाते पेन्शन
यूपी सरकारद्वारे चालवल्या जाणार्या या वृद्धा पेन्शन योजनेत, 60 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना पेन्शन दिली जाते. शहरात राहणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 56,460 रुपये आणि गावात राहणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न रुपये 46,080 पेक्षा कमी असेल तर अशास सर्वच लोकांना उत्तर प्रदेश सरकारच्या या पेन्शन योजनेचा लाभ मिळतो.
किती पेन्शन मिळते
ज्या लोकांचे वय 60 ते 79 वर्षे आहे यूपी सरकार त्या व्यक्तीला दरमहा एक हजार रुपये पेन्शन देते. यामध्ये यूपी सरकारकडून 800 रुपये आणि केंद्र सरकारकडून 200 रुपये दिले जातात. त्याच वेळी, 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना 1,000 रुपये पेन्शन देखील दिली जाते. यामध्ये यूपी सरकारकडून 500 रुपये आणि केंद्र सरकारकडून 500 रुपये दिले जातात.
या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धतही सोपी आहे
पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. यासाठी एसएसपीवाई-यूपी डॉट जीओवी डॉट इन वर जावे लागेल. याठिकाणी एक फॉर्म येईल. यावर जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि बँक खात्याची माहिती यांसारखी सर्व आवश्यक कागदपत्रे देणे आवश्यक आहे.
त्यानंतर सर्व माहितीसह शहानिशा केली जाते. भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याचे आढळल्यास ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पेन्शनची रक्कम मिळू लागते.