परवेझ मुशर्रफ यांचा जन्म दिल्लीतील दर्यागंज येथे झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब पाकिस्तानात गेले. 1961 मध्ये परवेझ मुशर्रफ पाकिस्तानी लष्करात दाखल झाले. 1965 आणि 1971 या दोन्ही युद्धात भारताकडून त्यांचा दोनदा पराभव झाला. मुशर्रफ यांना 1998 मध्ये लष्करप्रमुख बनवण्यात आले होते.
त्यांनतर 2002 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुशर्रफ विजयी झाले होते. दरम्यान 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ Nawaz Sharif यांच्यासोबत चर्चा करत दोन्ही देशांमधील सद्भावनेसाठी प्रयत्नात गुंतले होते. दरम्यान, परवेझ मुशर्रफ यांनी दोन्ही देशांमधील वैर वाढवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी हवाई दल आणि नौदलालाही युद्धाची माहिती देण्यात आली नाही.
कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय लष्कराचे प्रमुख असलेले वेद प्रकाश मलिक यांनी ‘फ्रॉम सरप्राइज टू व्हिक्ट्री’ या पुस्तकात लिहिले आहे की, परवेझ मुशर्रफ यांची फसवणूक समजून घेणारे कोणी नव्हते. मात्र, भारतीय गुप्तचर संस्था रॉला याची माहिती मिळाली होती.
परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानी मंत्रिमंडळाला युद्धाची तयारी कळूही दिली नाही. त्याचवेळी पाकिस्तानी सैन्य जिहादीच्या वेशात LAC ओलांडून आले. पाकिस्तानी लष्कर कारगिलच्या शिखरावर पोहोचल्यावर मुशर्रफ यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना माहिती दिली. या युद्धात पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.