महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे येथे लवकरच काही पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही पदे वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.
खालील जागांसाठी भरती
वैद्यकीय अधिकारी
एकूण जागा – ४९
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण घेतलेले असावे. उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असावे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी पदाच्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता केलेली असावी.
वयोमर्यादा
खुल्या प्रवर्गातील उमेदवार – 38 वर्ष
मागासवर्गीय उमेदवार – 43 वर्ष
खालील कागदपत्र आहेत आवश्यक
Resume
दहावी, बारावी आणि पदवीची सर्टिफिकेट
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र
पासपोर्ट साईझ फोटो
या पत्त्यावर करा अर्ज
वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023