सध्या महाराष्ट्रात विविध महामार्गांचे काम सूर आहे. दरम्यान आता आणखी काही महामार्ग आणि रेल्वे मार्गांचे काम प्रस्तावित आहे. दरम्यान या कामात सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांमुळे अनेक मोठी शहरे जोडली जातात आणि व्यापार व दळणवळण त्यामुळे सोयीचे झाले आहे.
आता पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे Pune Nashik Semi High Speed Railway प्रकल्पावर काम सुरु आहे. त्यामुळे पुणे, अहमदनगर Ahmednagar District आणि नाशिक जिल्हे Nashik District जोडले जाऊन औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडताना दिसेल यात शंका नाही.
पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प
पुणे, अहमदनगर आणि नाशिक या शहरांसाठी महत्त्वाचा असलेला हा रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारकडून एक परवानगी मिळवण्याच्या बाबतीत वेळ होत असल्यामुळे याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. या हाय स्पीड रेल्वे मार्गाचा जो काही तिढा आहे तो सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक पार पडणार होती.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील सात गावांची मोजणी पूर्ण
हा रेल्वे मार्ग हवेली तालुक्यातील बारा गावांमधून जात असून यातील सात गावांची मोजणी पूर्ण करण्यात आलेली आहे व इतर गावांची मोजणीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच याच तालुक्यातील दोन गावांसाठी नगररचना विभागाकडे परवानगी मागण्यात आली असून खेड तालुक्यातील संरक्षण विभागाच्या सूचनेनुसार नवीन अलाइनमेंट ची संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती देखील हवेलीच्या भूसंपादन अधिकारी रोहिणी आखाडे यांनी दिली.
खेड तालुक्यातील या बारा गावांमधून जाणार हा रेल्वे मार्ग
नासिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गासाठी खेड तालुक्यातून आळंदी, सोळू, खडाचीवाडी, रासे, गोळेगाव, चहोली खुर्द, धानोरे, वाकी बुद्रुक, काळुस, मरकळ, खरपुडी खुर्द तसेच केळगाव या बारा गावांमधून हा रेल्वे मार्ग जाणार असून त्यामधील केळगाव हे गाव रद्द करण्यात आले आहे. या ठिकाणी संरक्षण विभागाचे बॉम्ब निर्मितीचे युनिट असून त्यामुळे हा रेल्वे मार्गास लष्कराने अक्षर घेतला होता व तेथील अलाईटमेन्ट म्हणजे आता बदलण्यात आले आहे.