सध्या राज्याच्या राजकारणात रणधुमाळी पाहायला मिळत आहे. कारण आहे पुण्यातील पोटनिवडणुका.
कसबा आणि चिंचवड चे काम लवकरच निवडणूक पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि इतर पक्ष आणि भाजपकडून सातत्याने बैठका होत आहेत.
परंतु आता निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख यांनी रविवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री पुत्र बागवे यांनी शेख यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. मात्र, त्यांच्या नकळत सगळं घडल्याने काँग्रेसचे माजी मंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे हे भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा रंगली आहे.
बागवेंचा शेख यांना विरोध का होतोय?
रशीद शेख यांचा मुस्लीम समाजावर मोठा प्रभाव आहे. रमेश बागवे हे 2019 च्या विधानसभेत यांना याचा फटका बसला. बागवे यांचा साडेपाच हजारमतांनी पराभव झाला. त्यामुळे शेख यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्यास बागवे यांचा विरोध होता. त्यामुळे बागवे यांना कोणतीही कल्पना न देता शेख यांना थेट काँग्रेस भवनात पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला.
2019 च्या निवडणुकीत साडेपाच हजार मतांनी पराभूत ज्यामुळे झालो त्यांना पक्षात घेऊ नये, असे बागवे म्हणाले. मात्र, ऐनवेळी त्यांना कार्यक्रमस्थळ बोलावून प्रवेश घेण्यात आला. बागवे सुमारे पाच वर्षे काँग्रेसचे अध्यक्ष होते. बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे हे ही तीन वेळा काँग्रेसचे नगरसेवक आहेत. शेख यांच्या प्रवेशाने नाराज झालेल्या बागवे पिता-पुत्रांची नाराजी समजतात भाजपकडून अविनाश बागवे यांना तातडीने आज संपर्क करण्यात आल्याचे समजले आहे.