पुणे : त्या महिलेला फोन करून माझ्याकडे तुमचा डेटा तसेच कॉल डिटेल्स रेकॉर्ड म्हणजेच सीडीआर डेटा आहे. लग्नात पती आणि नातलगांना पडद्यावर दाखवून बदनाम करण्याची धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागितली.
गुरुवार ते रविवार दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने सोमवारी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महिलेला फोन करणाऱ्या मोबाइलधारकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका मोबाइल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने फिर्यादींना आपला सीडीआर डेटा आपल्याकडे असल्याचे सांगितले आणि १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लग्नात पती आणि नातलगांना पडद्यावर बदनाम करण्याची धमकी दिली.
तसेच पहिल्यांदा ५० हजार रुपये आणि नंतर एक लाख रुपयांची खंडणी मागितली. असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळउडाली आहे.