spot_img
Saturday, October 12, 2024
महाराष्ट्रRaj Thackeray Speech : बहुचर्चित सभेसाठी पुण्याहून राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना

Raj Thackeray Speech : बहुचर्चित सभेसाठी पुण्याहून राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना

spot_img

Raj Thackray Aurangabad Rally Sabha Live :राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करत आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतल्याने राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या Raj Thackeray उद्या औरंगाबादेत होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राजकीय वर्तुळासह इतरांचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा आज पुणे ते औरंगाबाद दौराही चर्चेत आहे. आज वेगवेगळ्या कार्यक्रमांनी या दौऱ्याची आखणी करण्यात आली आहे. आणि औरंगाबादच्या सभेआधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मनसेनं केला आहे. पुणे ते औरंगाबाद प्रवासात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागतही केलं जाणार आहे.

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद च्या सभेचं काऊंटडाऊन सुरु

राज ठाकरे यांच्या संभाजीनगर Sambhaji Nagar च्या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. १ मे महाराष्ट्र दिनी होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे ( Aurangabad ) नाव संभाजीनगर ( Sambhaji Nagar ) करण्याची मागणी केली होती. आता त्याच महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची उद्या सभा होतेय. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवलाय. तसंच ते भोंगे उतरवण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे आता राज ठाकरे उद्या कोणती गर्जना करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरी तोफ कुणावर धडाडणार याची उत्सुकता लागलीय.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या