मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये होणारी सभा चर्चेत आहे. ही सभा १ मे रोजी होणार आहे. पण या सभेवरून सस्पेन्स कायम आहे. कारण या सभेला अद्याप पोलिसांनी परवानी दिलेली नाही. यामुळे राज ठाकरेंची होणार का? आणि होणार तर ती कुठेही होईल? याकडे लक्ष आहे.
औरंगाबाद: मनसे प्रमुख राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादच्या ( raj Thackeray rally ) मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. मात्र अद्याप पोलिसांकडून या सभेला परवानगी देण्यात आली नाही. पण सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मनसेने सभा न घेता शहरातील गरवारे स्टेडियमवर ही सभा घ्यावी, असा पर्याय पोलिसांनी त्यांना सुचवला असल्याचं समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्समधून हा दावा केला जात आहे.
राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी सभा घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मनसेकडून राज ठाकरे यांच्या सभेची तयारी सुरू झाली. तसेच मैदान सुद्धा बुक करण्यात आले आहे. पण पोलिसांकडून सभेला अजूनही परवानगी मिळालेली नाही. तसेच सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाऐवजी गरवारे स्टेडियमवर ही सभा घेता येईल का? याबाबत पोलिसांनी मनसेच्या नेत्यांना विनंती केली आहे. त्यामुळे आता मनसे काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र सभेचे ठिकाण बदलण्याचा प्रश्नच नाही, असे मनसेच्या काही नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
मनसेची आज पत्रकार परिषद…
राज ठाकरे यांच्या सभेबाबत करण्यात येत असलेल्या नियोजन आणि आत्तापर्यंत घडलेल्या घडामोडींवर माहिती देण्यासाठी आज मनसेकडून दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. तसेच अनेक हिंदू संघटनांनी या सभेला पाठिंबा दर्शवला असून याचेही माहिती या पत्रकार परिषदमध्ये देण्यात येणार आहे.