spot_img
Sunday, October 13, 2024
ताज्या बातम्यारतन टाटा नंतर टाटाच्या 100 पेक्षाही जास्त कंपन्या कोण चालवतय? कसे घेतले...

रतन टाटा नंतर टाटाच्या 100 पेक्षाही जास्त कंपन्या कोण चालवतय? कसे घेतले जातात निर्णय? पहा

spot_img

घराच्या स्वयंपाकघरापासून ते आकाशातल्या प्रवासापर्यंत सर्वत्र टाटा Tata Company हेच नाव दिसेल. मीठ-मसाले असो वा पाणी-चहा-कॉफी, घड्याळ-दागिने असो किंवा आलिशान कार, बस, ट्रक आणि विमानांचा प्रवास असो, टाटा समूहाचा ( Tata Group ) व्यवसाय ( Tata Business ) प्रत्येक क्षेत्रात पसरलेला आहे.

या 157 वर्षे जुन्या समूहातील 17 कंपन्या देशातील Tata Group Listed Companies In Share Market शेअर बाजारात लिस्टेड आहेत.

ट्रेडिंग फर्मपासून व्यवसाय सुरू केला
स्वातंत्र्यापूर्वी 1868 साली एका व्यापारी कंपनीतून सुरू झालेला टाटा समूह देशाच्या एकूण जीडीपीच्या सुमारे दोन टक्के भागीदार आहे. FY22 मध्ये टाटा समूहाचे एकूण मार्केट कॅप ( Tata Companies Market Cap ) सुमारे $240 अब्ज किंवा सुमारे 21 ट्रिलियन रुपये आहे. महसुलाबद्दल बोलायचे तर, आर्थिक वर्ष 2022 मध्ये ते सुमारे $128 अब्ज होते. जमशेटजी टाटा Jamshedji Tata यांनी उभारलेल्या या प्रचंड व्यावसायिक साम्राज्यात सुमारे 9,35,000 कर्मचारी कार्यरत आहेत.

बराच काळ रतन टाटांच्या हाती कारभार
1991 मध्ये टाटा समूहाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रतन टाटा यांनी दीर्घकाळ आपल्या क्षमतेच्या जोरावर व्यवसायात लक्षणीय वाढ केली. टाटा सन्सचे Tata Sons अध्यक्ष असताना रतन टाटा यांनी प्रत्येक कंपनीला फायदेशीर कंपनी बनवण्याचे काम केले.

2012 मध्ये त्यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा Tata Sons President राजीनामा दिला होता आणि त्याची कमान सायरस मिस्त्री Cyrus Mistry यांच्या हाती आली होती, परंतु विविध समस्यांमुळे 2016 मध्ये मिस्त्री यांना पदावरून हटवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला होता. आणि ते गेल्यानंतर रतन टाटा यांनी पुन्हा समूहाची जबाबदारी आपल्या हातात घेतली.

टाटा सन्स समूहाचे मुख्य प्रमोटर
जानेवारी 2017 मध्ये, रतन टाटा यांनी सेवानिवृत्ती घेतली आणि तेव्हा नटराजन चंद्रशेखरन ( Natarajan Chandrasekaran -Chairperson of the Tata Group ) यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. टाटा समूह आणि त्यांच्या कंपन्यांच्या पर्यवेक्षणाबद्दल बोलायचे तर, टाटा सन्स हे या ग्रुपचे मुख्य प्रमोटर आणि प्रमुख गुंतवणूकदार आहेत. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची Tata Trust 66 टक्के भागीदारी आहे, जी शिक्षण, आरोग्य, कला, संस्कृती यासारख्या क्षेत्रात काम करत आहे. रतन टाटा यांनी राजीनामा दिल्यानंतर एन चंद्रशेखरन हे ग्रुपमधील कंपन्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.

अशा प्रकारे ग्रुपमधील कंपन्यांना हाताळले जाते
टाटा समूहाच्या कंपन्यांचे व्यवहार कसे पहिले जातात ? यावर बोलायचे झाल्यास, समूह कंपनी किंवा एंटरप्राइझ स्वतःच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली स्वतंत्रपणे कार्य करते. टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अजूनही रतन टाटा यांच्याकडेच आहे.
त्याचबरोबर ट्रस्टमध्ये विजय सिंह आणि मेहली मिस्त्री यांच्यासह अन्य विश्वस्तांचा समावेश आहे.

अलीकडे टाटा समूहातही नवीन पिढी दाखल झाली आहे. अलीकडेच, टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या बोर्डाने रतन टाटा यांचे भाऊ नोएल टाटा यांच्या तीनही मुलांचा समावेश केला आहे. यामध्ये लेआ टाटा, माया टाटा आणि नेव्हिल टाटा यांच्या नावांचा समावेश आहे.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या