Reliance Hydrogen Truck: हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अदानी समूह देशोधडीला असताना अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मोठी झेप घेतली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने हायड्रोजनवर चालणारा देशातील पहिला ट्रक लाँच केला आहे. अंबानी यांनी हायड्रोजनवर चालणारा ट्रक लाँच करून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला मोठी टक्कर दिली आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या झपाट्याने बदल होत आहेत. रिलायन्सने आता नवी झेप घेतली आहे. देशातील प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनाला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने मोठ्या संख्येने लाँच केली जात आहेत. ऑटो सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसह हायड्रोजनवर चालणारी वाहने आणण्याचाही प्रयत्न केला जात आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने इंडिया एनर्जी वीकमध्ये अशोक लेलँडच्या सहकार्याने हायड्रोजनवर चालणारा ट्रक लाँच केला आहे. हायड्रोजनवर धावणारा हा देशातील पहिला ट्रक आहे. हायड्रोजन हा शून्य टक्के प्रदूषणाचा इंधन स्रोत मानला जातो. त्यातून ऑक्सिजन चे उत्सर्जन होते. अशोक लेलँडने लाँच केलेला हा ट्रक आकाराने मोठा आणि अतिशय मजबूत आहे. H2ICE तंत्रज्ञान असलेला हा देशातील पहिला ट्रक आहे.
हायड्रोजनवर चालणारी वाहने (H2ICE) डिझेलवर (आयसीई) चालणाऱ्या वाहनांसारखीच कामगिरी करतात. एच 2 हायड्रोजन फॉर्म्युला आहे आणि आयसीई इंधन इंजिन आहे. भारत हायड्रोजनच्या वापरावर भर देत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपण हायड्रोजनवर धावू शकणार असल्याचे जाहीर केले होते.
हायड्रोजनचा वापर पोलाद प्रकल्पांपासून खत युनिटपर्यंत केला जाऊ शकतो. हे हायड्रोकार्बन बदलू शकते. हायड्रोजनचा इंधन म्हणूनही वापर करता येतो. हायड्रोजन वाहनांची उत्पादन किंमत खूप जास्त आहे. मात्र, अनेक कंपन्या हायड्रोजन उत्पादनात गुंतवणूक करत आहेत.