सध्या कार घेण्याकडे तरुणांचा ओढा चांगलाच वाढला आहे. कार ची क्रेझ खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. अनेकदा जर कुटुंब मोठे असेल तर आपल्याला मोठी कारची गरज लागते. परंतु अनेकदा आपले आर्थिक बजेट कमी पडते. तुमही यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
रेनॉल्ट ट्रायबर ही कार मध्ये एक उत्तम पर्याय आहे. ही कार तुम्ही अवघ्या एक लाख रुपयांत घरी आणू शकता. चला जाणून घेऊयात –
Renault Triber Finance किंमत
Renault Triber चे बेस मॉडेल RXE ची एक्स-शोरूम किंमत ५,९९,८०० रुपये आहे. ट्रायबर बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत ६,६७,४७८ रुपयांपर्यंत जाते. परंतु खाली नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही १ लाख लाखांतही ही कार घरी आणू शकता.
Renault Triber finance फायनान्स प्लॅन
जर तुम्ही ही SUV फायनान्स प्लॅनद्वारे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, तुमच्याकडे १ लाख रुपये असल्यास बँक या MPV वर ५,६७,४७८ रुपये कर्ज देऊ शकते. या कर्जावर ९.८ टक्के वार्षिक व्याजदर लागू होईल. जर हे कर्ज मंजूर झाले तर ६० महिन्यांसाठी दरमहा १२,००१ रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल.