सॅमसंग ही स्मार्टफोनमधील Samsung Smartphone सध्याची अव्वल कंपनी आहे. या कंपनीचे मोबाईल किंवा इतर डिव्हाईसला जास्त मागणी असते. आता सॅमसंग (SAMSUNG) च्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. आता तुम्ही सॅमसंग आपला नवीन 5G स्मार्टफोन Samsung Galaxy A14 5G लॉन्च करत आहे.
सॅमसंग इंडियाचे मोबाईल बिझनेसचे वरिष्ठ संचालक आदित्य बब्बर यांनी एका ठिकाणी माहिती देताना सांगितले की, की नवीन 5G स्मार्टफोन लवकर लाँच करणे हा कंपनीच्या 5G-प्रथम धोरणाचा एक भाग आहे आणि दक्षिण कोरियाच्या कंपनीला या वर्षी 75 टक्के स्मार्टफोन बिझनेस हा 5G उपकरणांद्वारे सेक्युअर करायचा आहे.
त्याचप्रमाणे पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी परवडणारे अनेक पर्याय आणले आहेत, ज्यात अत्यंत कमी EMI चा देखील समावेश आहे. आताच नवीन-लाँच झालेला Galaxy A14 5G हा अवघ्या 44 रुपये प्रतिदिन इतक्या कमी EMI वर देखील उपलब्ध आहे.
Samsung Galaxy A14 5G चे फीचर्स
Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.5-इंचाचा IPS LCD फुल एचडी डिस्प्ले मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला 60HZ चा रिफ्रेश दर पाहायला मिळेल. फोनमधील चिपसेट (Dimensity 700 आणि Exynos 1330) दोन भिन्न स्मार्टफोन्सचे प्रकार वेगवेगळ्या चिपसेटसह पाहिले जाऊ शकतात.
तुम्हाला Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप सेन्सर पाहायला मिळेल. ज्यामध्ये 50MP चा प्राइमरी लेन्स सेंसर असेल. याशिवाय स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये 13MP सेल्फी शूटर कॅमेरा उपलब्ध असेल. स्मार्ट फोनला पॉवर बॅकअप देण्यासाठी, बॅटरी देखील उत्तम आणि मजबूत असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 5000mAh च्या पॉवरफुल बॅटरी व्यतिरिक्त 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत अगदी कमी किमतीत उपलब्ध होईल असे दिसते.