Samsung कंपनी स्मार्टफोन सीरीज S23 लॉन्च करणार आहे. या सिरीज मध्ये, सॅमसंग तीन नवीन स्मार्टफोन Samsung New Smartphone लॉन्च करणार आहे Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra. सॅमसंगचा हा लाँच इव्हेंट भारतीय टाईमनुसार रात्री 11.30 वाजता सुरू होणार आहे. या सॅमसंगच्या इव्हेंटमध्ये कंपनी आपले आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली मोबाईल लॉन्च करणार आहे.
लीक झालेल्या माहितीनुसार, Galaxy Unpacked 2023 मध्ये फक्त स्मार्टफोनच नाही तर Laptop देखील लॉन्च करणार आहे. हा कार्यक्रम तुम्ही SamSung च्या अधिकृत YouTube चॅनेल वर थेट पाहू शकता. याशिवाय, तुम्ही हा इव्हेन्ट सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट आणि इतर सोशल मीडिया हँडल्सवर लाईव्ह पाहू शकाल.
Samsung Galaxy S23 सिरीज मध्ये काय वैशिष्ट्ये असणार?
हा स्मार्टफोन लॉन्च करण्यापूर्वी सॅमसंगने स्वतः काही माहिती उघड केली आहे. Samsung Galaxy S23 सिरीजमध्ये यूजर्सला Triple Rear Camera मिळेल. काही रिपोर्ट्सनुसार, S23 अल्ट्रा सीरिजच्या प्रकारात 200MP कॅमेरा उपलब्ध असेल. Samsung त्यात इन-हाउस ISOCELL HP2 सेन्सर देऊ शकतो.
Samsung दुसरीकडे, हार्डवेअर फ्रंटवर, क्वालकॉमचा नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर स्मार्टफोनमध्ये देऊ शकते. तर S23 आणि S23 Plus मध्ये, कंपनी 50MP Front Camera देऊ शकते, जो 10MP टेलिफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रा वाइड अँगल ultra wide angle camera लेन्ससह येऊ शकतो.
किंमत किती असू शकते?
तसे, Samsung Smartphone किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, कंपनी Samsung Galaxy S22 सीरीज पेक्षा 7 हजार रुपये जास्तीच्या किंमतीत नवीन स्मार्टफोन लॉन्च करू शकते. म्हणजे S23 ची किंमत 79,999 रुपये, Galaxy S23 Plus ची किंमत 89,999 रुपये आणि Galaxy S23 Ultra ची किंमत 1,14,999 रुपये असू शकते.