SBI Salary Account : पगारदार वर्गांसाठी सॅलरी अकाउंट हे बँकेमध्ये उपलब्ध असणारे विशेष बचत खाती आहेत ज्यात जबरदस्त फायदे अन अलभ मिळतात. हे सर्वात प्रगत आणि सुरक्षित नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवांपर्यंत सीमलेस एक्सेस प्रोवाइड करते. स्टेट बँक ऑफ इंडिया, देशातील सर्वात मोठी बँक, सरकारी कर्मचारी, कॉर्पोरेशन आणि इतरांसाठी विविध प्रकारचे सॅलरी अकाउंट ऑफर करते. SBI आकर्षक व्याजदरांसह या खात्यांवर मोफत डेबिट कार्ड, मोबाइल बँकिंग आणि नेट बँकिंग इत्यादी अनेक फायदे आणि सेवा देते.
SBI मध्ये सॅलरी अकाउंट कसे उघडावे त्याचे फायदे काय हे येथे जाणून घेऊयात –
इतर फायदे जाणून घेऊयात
उर्वरित 4 फायद्यांमध्ये वैयक्तिक/हवाई अपघातांसाठी स्टॅंडर्ड कव्हरेज, कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज, कार लोन आणि होम लोन, पात्रतेनुसार ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि पात्रतेवर आधारित वार्षिक लॉकर रेंटल मध्ये डिस्काउंट आदींचा समावेश आहे. सॅलरी अकाउंट उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळख आणि पत्त्याचा पुरावा आणि लेटेस्ट सालेरी स्लिपसह नोकरीचा पुरावा समाविष्ट आहे. जे आधीच तुमचे SBI मध्ये बचत खाते असेल तर ते देखील सॅलरी पॅकेज खात्यांमध्ये रूपांतरित केली जाऊ शकतात.
खाते कसे उघडायचे
– ऑनलाइन “रिक्वेस्ट अ कॉल बॅक” फॉर्म भरा आणि सबमिट करा
– बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल आणि पुढील प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करेल
– तुम्ही जवळच्या SBI शाखेलाही भेट देऊ शकता
एसबीआय विषयी आणखी माहिती
स्टेट बँक ऑफ इंडियाने 3 फेब्रुवारी रोजी डिसेंबर तिमाहीत झालेलं नफा जाहीर केला. यामध्ये निव्वळ नफ्यात तब्बल 68 टक्के वाढ झाल्याचे जाहीर केले. स्टेट बँकेने डिसेंबर तिमाहीत 14,205 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. डिसेंबर तिमाहीत एसबीआयचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक 24 टक्क्यांनी वाढून 38,069 कोटी रुपये झाले आहे.