spot_img
Sunday, October 13, 2024
महाराष्ट्रहा अजित दादांवर अन्याय.. खा.सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? पहा

हा अजित दादांवर अन्याय.. खा.सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? पहा

spot_img

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर महाराष्ट्रभर राष्ट्रवादीने निषेध नोंदवला.

परंतु हे सर्व एकीकडे सुरु असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र याबद्दल काही वाच्यताही केली नाही. याबद्दल खा. सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी अजितदादांची पाठराखण केली आहे.

त्या म्हणाल्या की, अजितदादा वैयक्तिक सुट्टी वर आहेत. त्यांनी काही दिवस सुट्टी घेतली तर चर्चा होते. हा माझ्या भावावर अन्याय आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका झाली आहे.

त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझी राऊतांशी भेट झाली नाही. पण सत्याचा विजय झाला आहे. सत्यमेव जयते. राऊत यांना जसा न्याय मिळाला.

तसा अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनाही न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या