Stock Market Market : सध्या शेअर मार्केटमध्ये तरुणांचा उत्साह वाढत चालला आहे. अनेक लोक शेअरमध्ये गुंतवणूक करत आहेत. यात रिस्क देखील आहे. परंतु काही शेअर्स असे आहेत की ते अगदी थोड्या कालावधीत मालामाल करतात. असाच एक शेअर आहे Adcon Capital Services .
या शेअर्सने गेल्या दोन महिन्यांत गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. अॅडकॉन कॅपिटल ही नॉन-बँकिंग फाइनेंशियल कंपनी आहे.
गेल्या 2 महिन्यांत त्याच्या शेअरने गुंतवणूकदारांच्या पैशात जवळपास 700 टक्क्यांनी वाढ केली आहे. दोन महिन्यांपूर्वी या कंपनीचा स्टॉक 70 पैशांच्या आसपास होता. जो स्टॉक आता 5.52 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे.
दोन महिन्यात 1 लाखांचे 8 लाख
या कंपनीच्या स्टॉकमध्ये यापूर्वी सुमारे 711 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या नॉन-बँकिंग फाइनेंशियल कंपनीचा स्टॉक गेल्या वर्षी म्हणजेच 16 नोव्हेंबर 2022 रोजी BSE वर 68 पैशांच्या पातळीवर होता. या कंपनीचे शेअर्स आज म्हणजेच 20 जानेवारी 2023 रोजी BSE मध्ये 5.52 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 16 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आजच्या घडीला त्या व्यक्तीला सुमारे 8.11 लाख रुपये मिळाले असते.
शेअर्स 30 पैशांवरून थेट 5.52 रुपयांवर
या कंपनीच्या शेअरने गेल्या 19 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास 1740 टक्क्यांनी वाढवले आहेत. एडकॉन कॅपिटल सर्व्हिसेसचा शेअर 3 जून 2021 रोजी 20 पैशांच्या पातळीवर होता. आज म्हणजेच शुक्रवार, 20 जानेवारी 2023 रोजी कंपनीचे शेअर्स BSE मध्ये Rs.5.52 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 जून 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे पैसे सध्या 18.40 लाख रुपये झाले असते.
टीप: येथे गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.