आज अनेक लोक शेअर्समध्ये उतरत आहेत. दरम्यान आता एक नवीन नियम लागू होणार आहे. भारतीय इक्विटी मार्केट 27 जानेवारीला पूर्णपणे लहान ट्रांसफर साइकल मध्ये शिफ्ट होईल. यालाच T+1 सेटलमेंट म्हणतात. हा नियम लागू झाल्यानंतर, काय होईल ? तर या नियमाने कारभार संपल्यापासून 24 तासांच्या आत विक्रेत्याच्या आणि खरेदीदाराच्या खात्यात पैसे मिळण्याची परवानगी दिली जाईल.
सोप्या शब्दात सांगायचे झाले तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेला स्टॉक विकल्यास, पैसे २४ तासांच्या आत तुमच्या खात्यात जमा होतील. सर्व लार्ज-कॅप आणि ब्लू-चिप कंपन्या 27 जानेवारी रोजी T+1 प्रणालीवर स्विच करतील.
सध्या T + 2 प्रणाली आहे
सध्या मार्केट मध्ये T+2 प्रणाली लागू आहे. या प्रणालीमुळे खात्यात पैसे पोहोचण्यास ४८ तास लागतात. 2003 पासून शेअर बाजारात T+2 नियम लागू आहे. परंतु आता येत्या 27 जानेवारीला हा नियम बदलणार आहे. T+1 सेटलमेंट सिस्टीम गुंतवणूकदारांना फंड आणि शेअर्स रोल करून अधिक ट्रेडिंग करण्याचा पर्याय देईल.
जेव्हा खरेदीदारास शेअर्स प्राप्त होतात आणि खरेदीदारांकडून पैसे प्राप्त होतात तेव्हाच सेटलमेंट सायकल पूर्ण होते. भारतातील सेटलमेंट प्रक्रिया अजूनही T+2 रोलिंग सेटलमेंट नियमावर आधारित आहे. T+1 नियमांच्या अंमलबजावणीमुळे बाजारात तरलता वाढेल.
गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल?
हा नियम लागू झाल्यानंतर बाजारात अधिक रोकड उपलब्ध होणार आहे. अधिक रोकड उपलब्ध झाल्यामुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री करू शकतील, त्यामुळे मार्केट व्हॉल्युम वाढेल, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.