Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी नवीनतम अपडेट आले आहे. ताज्या बातम्यांनुसार, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात 3628 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होईल. लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
जिल्हा तलाठी संवर्गातील मंजूर 12636 पदांपैकी एकूण 8574 पदे कायमस्वरूपी असून उर्वरित पदे तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. तलाठी भरती 2023 लवकरच होणार आहे. शासनाने जी काही बिंदू नियमावली दिली होती ती सर्व शासकीय प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे त्यामुळे तलाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
-या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
-तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
-तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
-या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.