नवी कार खरेदी करताना या कारवर किती सूट मिळते हे जाणून घ्यायला हवं. कंपनीकडून सवलत किंवा डीलरकडून सवलती नक्कीच दिल्या जातात. यामुळे ग्राहकांचे हजारो रुपये वाचत आहेत. जर तुम्हाला या महिन्यात टाटा मोटर्सच्या अल्ट्रोज, टियागो, टिगोर आणि सफारी, हॅरियर सारख्या कार खरेदी करायच्या असतील तर या महिन्यात तुम्हाला 45 हजार रुपयांची बचत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात टाटाच्या कोणत्या कारवर डिस्काउंट ऑफर्स मिळत आहेत.
या महिन्यात टाटाच्या 10 लाख रुपयांच्या कारवर बंपर डिस्काउंट मिळू शकतो. यात एंट्री लेव्हल हॅचबॅक टियागो आणि एंट्री लेव्हल सेडान टिगोर तसेच प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोजचाही समावेश आहे. या महिन्यात यावर 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे. टिगोरवर 15 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट 13 रुपयांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. टाटा अल्ट्रोज खरेदी केल्यास 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल.
टाटा हॅरियर आणि सफारीवर डिस्काउंट ऑफर
टाटा मोटर्सच्या दोन पॉवरफुल एसयूव्ही सफारी आणि हॅरियर यांची देखील क्रेझ आहे. या दोन्हींपैकि कोणतीही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या महिन्यात बंपर डिस्काउंट मिळू शकतो. टाटा हॅरियर आणि सफारीवर सध्या 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. म्हणजेच यावर एकूण 45 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो.