Tata Motors Cars Price : Tata Motors ही ऑटो क्षेत्रातील Auto Sector अग्रगण्य कंपणी आहे. बहुतांश तरुणांचा ओढा हा टाटाच्या कार Tata Car घेण्याकडे असतो. मागील वर्षभराचा विचार केला तर भारतीय बाजारपेठेत कार विक्रीच्या बाबतीत टाटाने दमदार कामगिरी केली आहे.
आता नवीन वर्षात Tata Motors ने नवीन तयारी सुरु केली आहे. कंपनीने 2023 मध्ये आपल्या कारची विक्री वाढवण्यासाठी अनेक शानदार ऑफर आणल्या आहेत. अनेक कारच्या किमती कमी केल्या गेल्या आहेत, त्यासोबतच या कार्समध्ये सूटही दिली जात आहे. आज या ठिकाणी आपण टाटा मोटर्सच्या अशाच काही कारची माहिती घेऊयात –
टाटा टियागो Tata Tiago
सध्या टाटा मोटर्सच्या या कारवर कंपनीकडून 40 हजारांची सूट दिली जात आहे. टाटा टियागोची एक्स-शोरूम किंमत 5.45 लाख रुपये आहे. टाटा टियागोमध्ये 1.2 लीटर, 3 सिलेंडर रेवोट्रॉन इंजिन मिळते, हे इंजिन 85 एचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क देते. यासोबतच या कारमध्ये स्वीप्टबॅक हेडलाइट्स, मस्क्युलर बोनेट, 15-इंच अलॉय व्हील्स आदी सुविधाही उपलब्ध आहेत.
टाटा टिगोर Tata Tigor
या कारच्या खरेदीवर कंपनीकडून 45000 ची सूट दिली जात आहे. टाटा टिगोरची किंमत 6.1 लाख रुपये आहे . या कारला स्लोपिंग रूफ लाइन, रॅप अराउंड क्लियर टाइप , 15 इंच ड्युअल टोन अॅलॉय व्हील इत्यादी मिळतात. यासोबतच, जर आपण इंजिनबद्दल बोललो तर ते 85 एचपी पॉवरचे आहे आणि 113 एनएम पॉवरचा पीक टॉर्क जनरेट करते.
टाटा सफारी Tata Safari
टाटा सफारी ही Tata Motors मधील सर्वात लोकप्रिय कार आहे. ही कार खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्हाला यावर ₹65,000 ची बंपर सूट मिळते. त्याचबरोबर या कारमध्ये रूफ रेल, क्रोम ग्रिल, बंपर माऊंटेड हेडलाइट, ड्युअल टोन अलॉय व्हील आदी सुविधा उपलब्ध आहेत. यासोबतच लेदर सीट्स, पॉवर्ड फ्रंट सीट्स इत्यादी उत्तम फीचर्स त्याच्या केबिनमध्ये देण्यात आले आहेत.