टाटा मोटर्सच्या अनेक लोकप्रिय गाड्यांवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट , वाचा सविस्तर
सध्या फोरव्हिलर्सची मोठी क्रेझ आहे. तरुणांचा कल सध्या कार्स कडे वाढत आहे. त्यातच टाटा मोटर्सच्या गाड्या सध्या विशेष लोकप्रिय आहेत. हॅरियर, सफारी, टियागो, टिगोर आणि अल्ट्रोझ आदी गाड्यांची क्रेझ काही औरच आहे. सध्या टाटा च्या अनेक कार्स वर मोठा डिस्काउंट भेटत आहे. या महिन्यात तुम्हाला टाटा कारवर 65,000 रुपयांपर्यंत प्रचंड सूट मिळत आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या गाड्यांवर किती सूट मिळत आहे.
टाटा हॅरियर
टाटा हॅरियरवर सध्या 65,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ही कार 65,000 रुपयांपर्यंतच्या बेनिफीटसह उपलब्ध आहे. ही कार क्राइओटेक 2.0 लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनवर चालते.
टाटा सफारी
Tata Safari वर देखील 65,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. याचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या पर्यायासह येते. त्याच्या सर्व व्हेरिएंटवर 65,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Tata Safari मध्ये 2.0-लिटर डिझेल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 170 HP पॉवर जनरेट करते.
टाटा टियागो
Tata Tiago वर या महिन्यात 40,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Tata Tiago हॅचबॅकच्या पेट्रोल आणि CNG व्हेरिएंटवर ग्राहकांना 40,000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट मिळू शकतात.
टाटा टिगोर
Tata Tigor वर सध्या 35,000 रुपयांपर्यंत बेनिफिट उपलब्ध आहे. सध्या Tata Tigor च्या पेट्रोल आणि CNG या दोन्ही व्हेरियंटवर 35,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.