Tata Motors Car : टाटा मोटर्सने 1 फेब्रुवारी 2023 पासून आपल्या कारच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार कंपनीने आता आपल्या सर्व आयसीई आणि सीएनजी कारच्या किंमतीत वाढ केली आहे. परंतु इलेक्ट्रिक मॉडेल्सच्या किंमती पूर्वीसारख्याच ठेवण्यात आल्या आहेत. वाढता खर्च तसेच नियामक बदलांमुळे होणारा वाढता खर्च लक्षात घेऊन ही दरवाढ करण्यात आल्याचे टाटा मोटर्सने म्हटले आहे.
टाटाच्या फ्लॅगशिप एसयूव्ही – हॅरियर Tata Harrier आणि सफारी Tata Safari 25,000 रुपयांपर्यंत महाग झाल्या आहेत. आता हॅरियरची किंमत 15 लाख ते 22.60 लाख रुपये तर सफारीची किंमत 15.65 लाख ते 24.01 लाख रुपयांदरम्यान आहे. या किमती एक्स-शोरूम आहेत. तर सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही नेक्सॉन 17,000 रुपयांपर्यंत (वेगवेगळ्या महिन्यांनुसार) महाग झाली आहे. टाटाच्या सब-4 मीटर एसयूव्हीची किंमत 7.80 लाख ते 14.30 लाख रुपयांदरम्यान आहे.
टियागो Tiago आणि टिगोर Tigor या दोन्ही गाड्या 15 हजार रुपयांपर्यंत महाग झाल्या आहेत. त्यांचे सीएनजी व्हेरियंटही महाग झाले आहेत. टाटा टियागोची किंमत आता 5.54 लाख ते 8.05 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. एनआरजी व्हर्जनची किंमत 6.62 लाख ते 7.95 लाख रुपयांदरम्यान आहे.
तर टिगोरची किंमत आता 6.20 लाख ते 8.90 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. याशिवाय अल्ट्रोजच्या किंमतीत 15 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. टाटा अल्ट्रोजची किंमत आता 6.45 लाख ते 10.40 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
प्युअर ट्रिम वगळता टाटा पंचच्या सर्व व्हेरियंटच्या किंमतीत 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे. टाटाच्या मायक्रो एसयूव्हीची किंमत 6 लाख ते 9.47 लाख रुपयांदरम्यान आहे.