spot_img
Tuesday, March 21, 2023
महाराष्ट्रपुण्यात तणाव वाढला, पोलिसांच्या मोठा फौजफाटा रस्त्यावर

पुण्यात तणाव वाढला, पोलिसांच्या मोठा फौजफाटा रस्त्यावर

spot_img

पुणे शहरात बाईक-टॅक्सी Rapido Bike Taxi विरोधात रिक्षा चालकांनी आज आंदोलन पुकारलंय. या आंदोलनाला आता वेगळं रूप येताना दिसतंय

पुणे : पुणे शहरात रॅपिडो बाईक-टॅक्सीविरोधात रिक्षचालकांनी आज आंदोलन पुकारलंय आहे. या आंदोलनाला आता वेगळं रूप येताना दिसतंय. कारण रिक्षा चालक आज जास्तच आक्रमक झाले. यांनी आपल्या रिक्षा आंदोलनस्थळी सोडून ते तिथून निघून गेले. खरंतर ते जाणार नव्हते. पण जवळपास 200 पेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने घडामोडींना वेग आला.

पुण्याचे सह पोलीस आयुक्त Pune Police संदीप कर्णिक Sandip Karnik घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी आंदोलक रिक्षा चालकांना याआधीच रस्त्यावरुन रिक्षा काढण्याची विनंती केली होती. पण Auto Riksha Driver रिक्षा चालकांनी पोलिसांचं ऐकलं नाही. त्यामुळे पोलिसांचा Pune Police Action मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यावेळी रिक्षा चालक आपल्या रिक्षा घटनास्थळी सोडून निघून गेले. तर काही रिक्षाचालकांनी पोलिसांचं म्हणणं ऐकत आपल्या रिक्षा आपल्या घरी नेल्या.

रिक्षामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडींची समस्या निर्माण होत असल्याची भूमिका पोलिसांची आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व रिक्षा चालकांना तिथून रिक्षा हटवण्यास सांगितलंय.

या दरम्यान जे रिक्षा चालक आपली रिक्षा घटनास्थळावर सोडून पळून गेलेत त्यांची रिक्षा बाजूला करण्याचं काम पोलिसांकडून करण्यात आलं. त्यानंतर संबंधित रस्त्यावरील वाहतूक सुरु करण्यात आली.

पोलीस घटनास्थळी दाखल होताच आरटीओ कार्यालयापासून जहांगीर रस्त्याच्या दिशेला रिक्षा चालक निघून गेले आहेत. त्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरील रिक्षा बाजूला हटवल्या. सर्व रिक्षा आरटीओ कार्यालयात नेण्यात आल्या.

पुणे शहरातील दोन किमी परिसर हा रिक्षांनी भरला होता. संगमघाट ते आरटीओ कार्यालय, त्याचबरोबर जहांगीर हॉस्पिटलपर्यंतचा परिसर रिक्षांनी भरलेला होता.

शहरातील रॅपिडो बाईक-टॅक्सी बंद होत नाहीत तोपर्यंत आपण इथून हटणार नाहीत, अशी भूमिका रिक्षा चालकांनी घेतली होती. या प्रकरणी अखेर पोलिसांनी पोलीस बळाचा वापर सुरु केल्यानंतर रिक्षा चालक तिथून निघून गेले.

हे हि वाचा

जाहिरात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Healthy Snack: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ब्रोकोली, स्नॅकमध्ये करा अशा प्रकारे समावेश

How To Make Broccoli Pakoda: ब्रोकोली ही कोबीसारखी हिरवी भाजी आहे जी प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी सारख्या गुणधर्मांचा साठा आहे....

Health Tips : चहा चपातीचा नाश्ता करणे सर्वात हानिकारक का आहे, चला सविस्तर जाणून घेऊया

Health Tips : चहा आणि चपाती हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे ही अनेक...

Health Tips : Heart Attack पासून वाचण्यासाठी खाव्यात या 4 गोष्टी

Health Tips : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले अवयव कालांतराने बिघडत जातात. आपण जे खातो...

पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये भाजप समर्थकांमध्ये व अपक्ष उमेदवारात बाचाबाची , पोलिसांसमोर मारहाण

ही पोटनिवडणूक महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात मोठमोठ्या प्रचारकांनी प्रचार केला आहे. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची...

लग्न झालेल्यांना मोठा धक्का, मोदी सरकार 1 एप्रिलपासून बंद करणार ही योजना, दरमहिन्याला मिळणार नाही पैसे!

Pension Scheme: सरकारने लोकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, जेणेकरून केवळ लहान मुलेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही योजनांचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना...
जाहिरात