spot_img
Tuesday, October 15, 2024
अहमदनगर Ahmednagar Newsमहत्वाची बातमी : लाच घेताना 'तो' सरकारी कर्मचारी जाळ्यात

महत्वाची बातमी : लाच घेताना ‘तो’ सरकारी कर्मचारी जाळ्यात

spot_img

सध्या अनेक विभागात लाचखोरीच्या प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लाचखोरी हा समाजाला लागलेला अभिशाप आहे.

लाचलुचपत अनेकदा या कारवाया करत असते परंतु तरीदेखील लाच घेण्याचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. आता नगर जिल्ह्यातून एक बातमे समोर आली आहे.

निघोज येथे शेतकर्‍याच्या घराचा जळालेल्या इलेक्ट्रीक मिटर बदलून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या वायरमन तसेच ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. किशोर बाळासाहेब कळकुटे (वायरमन) व विकास अशोक वायदंडे (ऑपरेटर) असे या आरोपींचे नाव आहेत.

निघोज येथील वीज वितरण कार्यालय येथे सापळा रचून त्यांना जेरबंद करण्यात आले. एलसीबीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार निघोज परिसरातील एका शेतकर्‍याच्या घराचा इलेक्ट्रीक मिटर जळाला होता.

तो बदलून नवीन बसवण्यासाठी वायमन कळकुटे याने 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडतोडी अंती 2 हजार 800 रक्कम ठरली असल्याची माहिती समोर आली आहे.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या