एअरटेलने (Airtel) आपल्या ग्राहकांच्या गर्जा लक्षात घेऊन अनेक रिचार्ज प्लॅन Airtel Recharge Plan आणत असते. या प्लान्समध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. अशावेळी जर तुम्ही पोस्टपेड युजर असाल आणि अशा प्लॅनच्या शोधात असाल तर ज्यामध्ये तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना फायदा होतो तर एअरटेलचे हे दमदार प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कंपनीचे असे अनेक प्लॅन आहेत. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा सारख्या सुविधा मिळतात. याशिवाय या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन पूर्णपणे मोफत दिले जाते. यासोबत अॅमेझॉन प्राईमचे सब्सक्रिप्शनही दिले जाते.
कंपनीकडे 1199 रुपये, 1499 रुपये, 999 रुपये असे अनेक पोस्टपेड प्लॅन आहेत. ज्यामध्ये युजर्सना अनेक फायदे दिले जात आहेत. खरं तर टेलिकॉम कंपन्यांमध्ये वाढत्या स्पर्धेमुळे अनेक टेलिकॉम कंपन्या आपल्या युजर्ससाठी खूप छान प्लॅन्स देत आहेत.
1499 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या १४९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये दरमहिन्याला १०० जीबी डेटा मिळतो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंगसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळते. एसएमएसबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात. हा प्लॅन एक महिन्याचा आहे. इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर या प्लानमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते. याशिवाय डिज्नी + हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन देखील पूर्णपणे विनामूल्य मिळते. हे फायदे इतर योजनांपेक्षा खूप वेगळे आहेत. अशातच कंपनीचे हे प्लॅन युजर्सच्या फेव्हरेट प्लॅन्सच्या यादीत सामील झाले आहेत.
1199 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या १,१९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये कुटुंबासाठी एक स्टँडर्ड आणि दोन अॅड-ऑन कनेक्शन देण्यात आले आहेत. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येईल. नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन पूर्णपणे विनामूल्य दिले जाते. एकंदरीत हे प्लॅन युजर्ससाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.
999 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारे फीचर्स थोडे कमी करण्यात आले आहेत. यामध्ये अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन दिले जाते. पण यात तुम्हाला नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन मिळत नाही. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेऊ शकता.