स्वतःची कार असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. तुम्हला देखील बजेट कमी असेल पण चांगली ग्राउंड क्लिअरन्स असलेली कार घ्यायची असेल तर तुम्ही खालील पर्यायांचा विचार करू शकता.
टाटा टियागो Tata Tiago
टाटाची हॅचबॅक कार टाटा टियागो ही देखील प्रसिद्ध कार पैकी एक आहे. यात 181 मिमी ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. तर या कारची एक्स-शोरूम किंमत 6.50 लाख रुपये आहे. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह कार उपलब्ध आहे.
रेनॉल्ट ट्राइबर Renault Triber
रेनॉल्टची रेनॉल्ट ट्रायबर ही देशातील सर्वात कमी किंमतीची 7-सीटर कार आहे. त्याची किंमत 5.91 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 182 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल अशा दोन्ही पर्यायांमध्ये कार उपलब्ध आहे.
रेनॉल्ट क्विड Renault Kwid
रेनॉल्ट क्विड कार देखील अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची किंमत 4.64 लाख रुपये आहे आणि तिचा ग्राउंड क्लीयरन्स 184 मिमी आहे. या कारमध्ये एबीएस, एअरबॅग्ज, ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, स्पीड वॉर्निंग सिस्टीम यांसारखे फीचर्सही उपलब्ध आहेत.
एस-प्रेसो Maruti s Presso
मारुती S-Presso, ही एक स्वस्त कार आहे जी उत्तम ग्राउंड क्लीयरन्ससह येते. ही कार 4.25 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे आणि तिचे ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आहे.