Quantino Twentyfive: सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक कारची चर्चा आहे. बऱ्याचदा आपण असे ऐकतो येणारा काळ हा इलेक्ट्रिक कारचा काळ असणार आहे. सध्या, जर आपण पहिले तर इलेक्ट्रिक कारमध्ये लिथियम-आयन बॅटरी अधिक वापरल्या जातात.
परंतु, जसजसा काळ पुढे सरकत आहे, तसतसे तंत्रज्ञान प्रगत होत आहे. आता एका कंपनीने अशी इलेक्ट्रिक कार बनवली आहे, ज्यामध्ये बॅटरीच नाही तरीदेखील ही कार 2000KM ची रेंज देईल. ही इलेक्ट्रिक कार म्हणजे क्वांटिनो ट्वेंटीफाइव्ह.
या कारमध्ये लिथियम आयन बॅटरीऐवजी समुद्राच्या पाण्याचे किंवा इंडस्ट्रियल वाटर वेस्टचे Nano-Structured bi-ION Molecules वापरण्यात येणार आहेत. म्हणजेच, सोप्या भाषेत, समुद्राच्या पाण्यावर किंवा औद्योगिक पाण्याच्या कचऱ्यावर ही इलेक्ट्रिक कार तुम्ही चालवू शकाल.
हे पाणी बायोफ्यूल म्हणून काम करेल. बायोफ्यूल हे विषारी, ज्वलनशील आणि घातक अजिबात नाही. यामुळे वीज निर्माण होईल, जी कारची मोटर चालवेल. कारच्या चारही चाकांवर इलेक्ट्रिक मोटर्स दिलेल्या आहेत. एकदा कार ची टाकी भरली की ते 2000 किमीची रेंज देईल .
यामुळे प्रदूषण होत नाही. कंपनीने क्वांटिनो ट्वेंटीफाइव्ह इलेक्ट्रिक कारची सुमारे 5 लाख किमी चाचणी घेतली आहे. एका रिपोर्टनुसार ही कार खूप वेगवान आहे. ही कार 3 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते.
इलेक्ट्रिक कार असल्याने आवाजही येत नाही. सदर कारचा लूक जबरदस्त आहे. या इलेक्ट्रिक कारची रचना अतिशय आकर्षक असून ती अतिशय एयरोडायनेमिक असल्याचे दिसून येत आहे. सदर कार एयरोडायनेमिकली देखील चांगले आहे.