आज 7 फेब्रुवारी 2023 रोजी द्वितीया तिथि आहे. आज माघ नक्षत्र आहे. चला जाणून घेऊया सर्व 12 राशींचे राशीभविष्य…
मेष : आज राजकारणात नवे पद मिळू शकते. थोडा सावधपणे खर्च करावा. विद्यार्थ्यांना फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. कामाचा ताण जास्त राहील.
वृषभ : व्यवसायात आजचा दिवस विशेष यशाचा आहे. व्यवसायात पैसा येऊ शकतो. लव्ह लाईफमुळे तरुणाई आनंदी राहील. नवीन प्रकल्पात पैसे गुंतविण्याची शक्यता आहे. घरातील लोक तुमचे आनंदाचे क्षण बिघडवू शकतात.
मिथुन : नोकरीत प्रगती होईल. विद्यार्थ्यांना यश मिळणे सोपे आहे. मुलाच्या लग्नाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करता येईल. आगामी काळात तुम्हाला पैशांची खूप गरज भासणार आहे. मित्रांच्या मदतीने कामे मार्गी लागतील.
कर्क : आज दांपत्य जीवन गोडवा देईल. बँकिंग क्षेत्रातील लोकांना फायदा होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. वडिलांचे आशीर्वाद घ्या.
सिंह : नोकरीत नवीन संधी मिळतील. राजकारणात यश मिळेल. आज वाहन चालवताना सावध गिरी बाळगण्याची गरज आहे. लव्ह लाईफमुळे तरुणाई आनंदी राहील. व्यापाऱ्यांना नवे ग्राहक मिळू शकतात. दिवसभराच्या धावपळीमुळे थकवा जाणवेल.
कन्या : तुम्ही आज आनंदी राहाल. आज विरोधक आवाज उठवण्याचा प्रयत्न करतील. व्यवसायात आज चांग दिवस ठरेल. आज नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. कोणतेही काम करण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला नक्की घ्या.
वृषभ : आज मुलाच्या प्रगतीबाबत आनंद मिळेल. आज तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. अशा वेळी भावनिक होणे अजिबात योग्य नाही. खर्च जास्त होईल,. जोडीदारासोबत वैयक्तिक वेळ घालवाल.
वृश्चिक : आज राजकारणात यश मिळेल, तर व्यवसायात नवीन प्रकल्प साध्य होईल. वरिष्ठांशी वाद घालण्याची गरज नाही. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. आपल्या पैशांवर लक्ष ठेवा, आपले पैसे कुठे खर्च होत आहेत हे पहा. अन्यथा अडचणी येऊ शकतात.
वृषभ : विद्यार्थ्यांसाठी आजचा काळ अनुकूल आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. व्यवसायात पैसा येण्याची चिन्हे आहेत. नशीब आज साथ देईल. प्रेमाशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. आर्थिक नुकसान होऊ शकते.
मकर : नोकरीशी संबंधित काही मोठी कामे करू शकता. उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यात रंजक आणि महत्त्वाचे वळण घेऊन येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाभ मिळेल. राजकारणी यशस्वी होतील. अचानक प्रवास करावा लागू शकतो. क्रिएटिव्ह कामाला सुरुवात करू शकाल.
कुंभ : विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आजचा दिवस आहे. व्यावसायिक जीवनात ही मोठी कामगिरी करता येईल. आज तुमच्या राशीत लव्ह योगा देखील तयार होत आहे. प्रिय व्यक्तींशी जवळीक वाढेल. व्यवसायाशी संबंधित कोणतेही काम सुरू करू शकता. वेळ चांगली आहे.
मीन : वाद मिटविण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. उद्या तुम्ही जे काही काम कराल त्याचा फायदा तुम्हालाच नाही तर इतरांनाही होईल. तिसऱ्याच कुणामुळे वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात. समन्वय राखा.
(सूचना : वरील माहिती काही मीडियारिपोर्ट अन पंचांगांवर आधारित आहे)