जग कितीही पुढे गेलं असलं तरी काही मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलायला किंवा व्यक्त होण्यास अजूनही मनाई आहे. अनेकांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. मुख्य म्हणजे ते मुद्दे काय आहेत हे सांगण्याची गरज नाही. कारण जग प्रगतीपथावर वाटचाल करत असले तरी दैनंदिन जीवनातील काही विषय अजूनही जागृतीअभावी दुर्लक्षित आहेत. शरीरसंबंध आणि त्याबद्दलची समजूत – गैरसमज हा त्याचाच एक भाग आहे.
शरीरसंबंध आणि त्याच्या विषयाच्या विचित्र कल्पनांमुळे आज काही समाज असे आहेत जे त्याकडे अत्यंत नकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात, त्याबद्दल बोलणे टाळतात. काही वेळा काही खाजगी शारीरिक समस्या ही उजेडात आणल्या जात नाहीत. एकविसाव्या शतकात असे तर २००० वर्षांपूर्वी नेमकी काय परिस्थिती होती याचा विचार करा.
तुम्ही काही अंदाज लावू शकता का? इथे तुमचं उत्तर चुकीचं असू शकतं, कारण दोन हजार वर्षांपूर्वी शरीरसंबंध, शारीरिक गरजा याविषयी थक्क करणारी परिस्थिती होती. Vindoland येथील Roman Fort परिसरात झालेल्या उत्खननातून आणि त्यानंतर झालेल्या संशोधन आणि पाहणीतून हे स्पष्ट होते. पण त्याबाबतही मतभिन्नता आहे.
काय आहे ही वस्तू?
खोदकामातील या वस्तूचा वापर महिला शारीरिक गरजा भागविण्यासाठी करत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. अनेक जुन्या वस्तू, चपला आणि कपड्यांच्यामध्येच ही वस्तू पडलेली आढळून आली.
संशोधक डॉ. रॉब कॉलिन्स यांच्या मते, ‘६.३ इंच लांबीची ही लाकडी वस्तू जर त्या वेळची टॉय असेल, तर अशा प्रकारच्या वापरातील ही ब्रिटनमधील सर्वात जुनी वस्तू ठरू शकते’. 1992 मध्ये विन्डोलँडमधील एका रोमन साम्राज्यातील किल्ल्यातून ही वस्तू जगासमोर आली होती. उत्तर इंग्लंडमधील हैड्रियनच्या भीतीच्या दक्षिणेला हा भाग असल्याचं म्हटलं जातं. या वस्तूंचा आकार आणि प्रकार लक्षात घेता त्याचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला, याचा अंदाज तज्ज्ञांना बांधता आला आहे.
लाकडी वस्तू आणि तिच्या वापरावरून सुरु असणारी चर्चा
दरम्यान, न्यूकॅसल युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिनच्या तज्ज्ञांनी या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रोमन साम्राज्यातील लोक अशा लाकडापासून बनवलेल्या लाकडाचा तुकडा वाईट प्रवृत्ती आणि कोणत्याही विचलनापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी वापरत असत. मात्र, या लाकडी वस्तूचा आकार पाहता त्याचा वापर केवळ वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी केला जात नव्हता, असे संशोधकांच्या एका गटाचे म्हणणे आहे.
सध्या या वस्तूच्या वापराबाबत अनेक दावे केले जात आहेत. काही संशोधकांच्या मते, या वस्तूचा वापर सौंदर्यप्रसाधने किंवा औषध तयार करण्यासाठी केला गेला असावा. किंवा तो एखाद्या मूर्तीचा भाग असू शकतो. मात्र, रोमन किल्ल्यातून एकही मूर्ती बाहेर आलेली नाही.
वरील तपासणी प्रक्रियेत सहभागी झालेले डॉ. रॉब सँड्स यांच्या मते, प्राचीन काळी अशा लाकडी वस्तू खूप सामान्य होत्या. तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत त्यांचा वापर केला गेला. अशा वस्तू अंधारात, ओलसरपणात आणि ऑक्सिजनमुक्त ठिकाणी ठेवल्या जात असत. त्यामुळे ही वस्तू अनेकांच्या आकर्षणाचा विषय असून ती सध्या विंडोलँडमधील संग्रहालात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे.