Union Budget 2023 : आज अनेक लोक पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. या सर्वांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. आर्थिक बजेटमध्ये पोस्ट ऑफिस गुंतवणुकीसंदर्भात एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.
आजच्या अर्थसंकल्पात पोस्ट ऑफिसच्या दोन योजनांमध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची कमाल मर्यादा 15 लाखांवरून 30 लाख रुपये केली आहे. याशिवाय, मासिक उत्पन्न खाते योजनेची कमाल ठेव मर्यादा देखील सिंगल खात्यांसाठी 4.5 लाख रुपयांवरून 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यांसाठी 9 लाख रुपयांवरून 15 लाख रुपये करण्यात आली आहे.
नवीन स्कीमची घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत पत्र जाहीर केले. मार्च 2025 पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही वन-टाइम ची नवीन लहान बचत योजना असेल. हा एक विशेष उपक्रम आहे, ज्या अंतर्गत एका महिलेला दोन वर्षांच्या कालावधीसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या ठेव सुविधेचा (गुंतवणूक) लाभ मिळेल. या योजनेत, आंशिक पैसे काढणे, म्हणजेच गरजेच्या वेळी मुदतपूर्तीपूर्वी थोडे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध असेल. या योजनेत 7.5 टक्के निश्चित व्याजदर जाहीर करण्यात आला आहे.
डिजिलॉकरचे डिटेल
डिजीलॉकर हा डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. हे एक डिजिटल दस्तऐवज वॉलेट आहे जे सध्या सरकारी ओळख दस्तऐवज, मार्कशीट आणि तत्सम महत्त्वाच्या कागदपत्रांना सपोर्ट देते. डिजीलॉकर डॉक्यूमेंट्सच्या कॅटेगिरीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, शिक्षण, बँकिंग आणि विमा, आरोग्य, संरक्षण आणि वाहतूक यांचा समावेश आहे. पॅन नंबरवर एक मोठी घोषणा करण्यात आली आहे, त्यानुसार आता पॅनचा वापर कॉमन बिजनेस आइडेंटिटी म्हणून केला जाऊ शकतो. सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी पॅनचा वापर कॉमन बिजनेस आइडेंटिटी म्हणून केला जाईल.