सध्या स्मार्टफोन्सची क्रेझ आहे. तुम्हालाही स्मार्टफोन घ्यायचा असेल तर एक महत्वाची बातमी आहे. तुम्हाला Samsung, Xiaomi, iQOO, Realme, Tecno आणि Oppo यांसारख्या ब्रॅंड्सचे मोबाईल अगदी कमी किमतीत मिळण्याची संधी उपलब्ध आहे. amazon ने एक प्राइम फोन पार्टी सेल लॉंच केला आहे.
प्राईम मेम्बरसाठी हा सेल असेल. यामध्ये वरील ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिल्स आणि ऑफर मिळत आहेत. प्राइम फोन पार्टी सेल 8 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यात स्मार्टफोन्सवर 40 टक्के पर्यंत सूट मिळू शकते. चला जाणून घेऊयात काही डिल्स बद्दल
Xiaomi Mi 12 Pro
Xiaomi प्राइम पार्टी सेल दरम्यान, Mi 12 Pro 47,499 रुपयांना उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि 50+50+50 मेगापिक्सेल कॅमेरासह येतो. या व्यतिरिक्त, तुम्ही इतर Xiaomi मॉडेल्स (जसे की Redmi 11 Prime 5G, Redmi K50i आणि Redmi 10 Power) सवलतीच्या दरात खरेदी करू शकता.
सॅमसंग फोन
प्राइम फोन पार्टी सेलमध्ये सॅमसंग आपल्या एम सीरिजच्या स्मार्टफोन्सवर चांगल्या डिल्स देत आहे. Galaxy M33, Galaxy M13 आणि Galaxy M04 अनुक्रमे Rs 15,342, Rs 9,927 आणि Rs 8,499 मध्ये खरेदी करू शकता.
iQOO
IQOO ने देखील त्यांच्या लेटेस्ट स्मार्टफोन्सवर सूट दिली आहे. यामध्ये IQOO Z6 Lite, IQOO Neo 6 आणि IQOO 11 5G यांचा समावेश आहे. खरेदीदार IQOO Z6 Lite आणि IQOO Neo 6 अनुक्रमे Rs 13,988 आणि Rs 25,649 मध्ये खरेदी करू शकतात. याशिवाय, तुम्ही लेटेस्ट iQOO 11 5G Rs.54,999 मध्ये खरेदी करू शकता.
realme
Realme च्या Narzo सीरीज़ वर अनेक ऑफर उपलब्ध आहेत, ज्यात realme Narzo 50, realme Narzo 50 Pro आणि realme Narzo 50i Prime यांचा समावेश आहे. हे स्मार्टफोन MediaTek Helio G96 गेमिंग प्रोसेसर आणि 5000 mAh बॅटरी सारख्या वैशिष्ट्यांसह येतात. Narjo 50 Pro आणि Realme Narjo 50i प्राइम अनुक्रमे रु. 18,049 आणि रु 7,199 मध्ये खरेदी करू शकता.