Valentine day Love Horoscope in Marathi : यंदा व्हॅलेंटाइन डेला ग्रहांची परिस्थिती खूप खास आहे. कुंभ राशीत शनी सूर्यासोबत युतीत आहे. तसेच प्रेम-रोमान्स देणारा शुक्र ही शनी-सूर्यासोबत जोडला जात आहे. जाणून घ्या कोणासाठी व्हॅलेंटाईन डे लकी आहे.
14 February 2023 Love Rashifal: जगभरात 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. ज्योतिषानुसार प्रेम-रोमान्सचा घटक शुक्र आहे आणि या वेळी कुंभ राशीत शनी सूर्यासोबत युतीत आहे. शनी-शुक्र आणि रवी यांच्या या युतीचा सर्व 12 राशींच्या लव्ह लाईफवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडत आहे. त्याचबरोबर काही राशींच्या लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा स्पर्श होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली आहे.
व्हॅलेंटाईनडे च्या शुभ राशी
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा व्हॅलेंटाईन डे अत्यंत शुभ आहे. अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात लव्ह पार्टनरची एन्ट्री होईल. ते विवाहबंधनात अडकू शकतात. हे लोक खूप चांगले जीवनसाथी सिद्ध होतात कारण ते त्याचा प्रेमाने सन्मान देखील करतात.
मिथुन : मिथुन राशीचे लोक खूप हुशार असतात आणि आपल्या जोडीदाराप्रती खूप प्रामाणिक असतात. ते प्रत्येक परिस्थितीत आपल्या जोडीदाराला साथ देतात. हा व्हॅलेंटाइन डे विवाहित लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. जोडीदाराकडून त्यांना सरप्राईज मिळू शकते.
कर्क : कर्क राशीचे लोक खूप उत्साही असतात आणि त्यांचे हृदय खेळीमेळीचे असते. ते आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवतात आणि त्याच्या प्रेमात कोणत्याही मर्यादेपर्यंत जातात. या व्हॅलेंटाईन डेला तो आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवणार आहे.
कन्या : कन्या राशीच्या व्यक्तींना प्रेमात अपयश येत नाही. या व्हॅलेंटाइन डेला आपल्या जोडीदाराला गिफ्ट देणं खूप शुभ ठरेल.
तूळ : तुला राशीचे लोक प्रेमात फसवणूक सहन करत नाहीत, म्हणून ते खूप सावध राहतात. ते आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि त्या बदल्यात प्रेम मिळवू इच्छितात. या व्हॅलेंटाइन डेला त्यांना भरभरून प्रेम मिळणार आहे.