Valentine Week 2023 Full List: फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना मानला जातो. आपल्या जोडीदारावर प्रेम करणारे लोक वर्षभर या महिन्याची वाट पाहत असतात. खरं तर फेब्रुवारी महिन्यात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. त्याचबरोबर व्हॅलेंटाईन डेच्या आधी संपूर्ण आठवडाभर वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. ज्यांना हे वेगवेगळे दिवस आवडतात ते वेगवेगळ्या प्रकारे साजरे करतात.
व्हॅलेंटाईन वीक Valentine Week
आज पासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात होत आहे. हा आठवडा ७ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १४ फेब्रुवारीपर्यंत चालतो. ७ फेब्रुवारी हा दिवस रोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना गुलाब देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात. त्यानंतर ८ फेब्रुवारी हा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगल आपल्या जोडीदाराला प्रपोज करतात आणि सांगतात की ते त्यांच्यावर किती प्रेम करतात.
वेलेंटाइन Valentine
त्यानंतर 9 फेब्रुवारी हा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना चॉकलेट देतात. १० फेब्रुवारी हा दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगल आपल्या जोडीदाराला टेडी बिअर भेट म्हणून देतात. तर 11 फेब्रुवारी ला प्रॉमिस डे साजरा केला जातो. प्रॉमिस डेला पार्टनर आपल्या प्रेमाने वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने देतात.
व्हॅलेंटाईन डे Valentine Day
तर १२ फेब्रुवारी हा हग डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना मिठी मारतात. तर 13 फेब्रुवारी हा दिवस किस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना किस करतात. तर 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो.