विवो फोनच्या (Vivo SmartPhone) वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, बॅटरी बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, व्हिडिओ साठी HD+ डिस्प्ले देखील उपलब्ध आहे.
जर तुम्ही कमी किमतीत एक उत्तम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी विवोने एक उत्तम फीचर असलेला स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने Vivo Y01 फोन भारताच्या बाजारात लॉन्च केला आहे. विशेष गोष्ट म्हणजे कंपनीने ह्या फोन ची किंमत फक्त ८९९९ रुपये ठेवली आहे.
फोनच्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, दीर्घ बॅटरी बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, स्पष्ट चित्रांसाठी HD+ डिस्प्ले देखील उपलब्ध आहे. कंपनीने याला एलिगंट ब्लॅक आणि सॅफायर ब्लू अशा दोन रंगांमध्ये सादर केले आहे. एकूणच, कमी किंमत असूनही, त्याची वैशिष्ट्ये जोरदार प्रभावी आहेत. बजेट सेगमेंटमध्ये हा फोन realme narzo 30A, Redmi 10A शी स्पर्धा करू शकतो.
Vivo Y01 चे Specification
फोनच्या खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.51 इंच एचडी + हॅलो फुल व्ह्यू डिस्प्ले आहे. हा फोन आय प्रोटेक्शन मोडसह येतो. यामध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच मल्टी-टर्बो 3.0 देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. फोनमध्ये 2 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज आहे. त्याची मेमरी 1 टीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये ट्रिपल कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.
कॅमेरा कसा आहे
किफायतशीर किंमत पाहता, कॅमेरा देखील त्यात मध्यम मिळेल. 8 मेगापिक्सेल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये लाइम लॅप्सपासून फेस ब्युटीपर्यंत अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.