Vodafone Idea : तुम्हीही Vodafone Idea चे प्रीपेड ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. प्रचंड कर्जामुळे सतत अडचणींचा सामना करत असलेल्या Vodafone Idea ने आपल्या प्रीपेड ग्राहकांना धक्का देणारी बातमी दिली आहे.
कंपनीची प्रीपेड रिचार्ज सेवा 13 तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुले जर तुमचे रिचार्ज संपणार असतील तर या आधीच करून घ्यावे अन्यथा आपली मोठी गरसोय होणार आहे. Vodafone Idea ने आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की कंपनीची प्रीपेड रिचार्ज सुविधा 22 जानेवारी रोजी रात्री 8:00 ते 23 जानेवारी रोजी सकाळी 9:30 पर्यंत बंद राहील. कंपनीने म्हटले आहे की ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी ती आपली प्रणाली अपग्रेड करत आहे. त्यामुळे 13 तास रिचार्ज सुविधा बंद राहणार आहे.
व्होडाफोन आयडिया मोठ्या संकटात
सध्या व्होडाफोन आयडिया अनेक संकटाच्या गर्तेत आहे. व्होडाफोन आयडियावर टॉवर सेवा प्रदात्याचे मोठे कर्ज आहे. याशिवाय कंपनीला रोख रकमेचाही सामना करावा लागत आहे. दुसरीकडे जर इतर गोष्टींचा विचार केला तर कंपनीने फारच कमी 5G स्पेक्ट्रम विकत घेतले आहे. तुलनेने त्यांचे प्रतिस्पर्धी Jio आणि Airtel वेगाने 5G सेवा सुरू करत आहेत. Vodafone ला मात्र अजूनही 5G सेवा सुरू करणे शक्य झालेले नाही. यासोबतच कंपनीचे ग्राहकही कमी होत चालले आहेत.
कंपनीचे लाइसेंस रद्द होऊ शकते
व्होडाफोन आयडियाची आर्थिक स्थिती आधीच बिकट आहे. त्याचबरोबर कंपनीने या महिन्यात लाइसेंस शुल्क भरण्यात डिफॉल्ट केले आहे. कंपनीने परवाना शुल्क सरकारला भरलेले नाही. त्यामुळे कंपनीचा परवाना रद्द होण्याची शक्यता बळावली आहे. कंपनीला परवाना शुल्क म्हणून 780 कोटी रुपये भरायचे होते, परंतु कंपनी केवळ 10 टक्के म्हणजेच 78 कोटी रुपये भरू शकली आहे.