spot_img
Sunday, October 13, 2024
लाइफस्टाइलकर्ज हवय? पण क्रेडिट स्कोअर कमी आहे, काळजी करू नका असे मिळवा...

कर्ज हवय? पण क्रेडिट स्कोअर कमी आहे, काळजी करू नका असे मिळवा क्रेडिट स्कोअरशिवाय कर्ज

spot_img

मुंबई : पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारी स्वरा कार खरेदीचं नियोजन करतेय. कर्जासाठी चौकशी केल्यानंतर तिला कळालं, तिचा क्रेडिट स्कोअर (Credit score) शून्य आहे. चांगला क्रेडिट स्कोअर असले तरच बँक (Bank) कर्ज देते. मात्र, स्वराला जास्त काळजी करण्याची गरज नाही. भारतात जवळपास 57 कोटी नागरिकांचं बँकेत खातं आहे, मात्र त्यांच्यावर कोणतंही कर्ज (Debt) नाही. यात सर्वात जास्त संख्या 39 टक्के जेनरेशन एक्स म्हणजेच ज्यांचा जन्म 1965 ते 1979 पर्यंत झालाय. तर 31 टक्के मिलिनियल्स कर्जापासून वंचित आहेत. मिलिनियल्स म्हणजेच ज्यांचा जन्म 1980 ते 1994 पर्यंत झालाय. बेबी बुमर्स 1946 ते 1964 पर्यंत जन्मलेले 26 टक्के नागरिक यात सहभागी आहेत. जनरेशन झेड यांचा हिस्सा सर्वात कमी म्हणजेच केवळ 4 टक्के आहे. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नाही.

चांगला क्रेडिट स्कोअर स्वस्त कर्ज
ज्या लोकांनी कर्ज घेतलं आहे त्यांच्या देवाण-घेवाणीचा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नसतो. अशा व्यक्तींचा क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर नसतो किंवा असला तरीही खूप कमी असतो. चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तींना स्वस्त कर्ज मिळतं आणि खराब क्रेडिट स्कोअर असलेल्यांना महाग कर्ज मिळते. मात्र, स्वरासारख्या व्यक्तींचं काय ? त्यांना कर्ज मिळणार की नाही ? जोपर्यंत एखादा व्यक्ती आर्थिक संस्थेतून कर्ज घेत नाही तोपर्यंत त्याचा क्रेडिट स्कोअर तयार होत नाही. अशा लोकांनी क्रेडिट स्कोअरच्या ऐवजी कर्ज घेण्यासाठी किती पात्र आहोत हे सिद्ध करावं. त्यासाठी काही बाबींचा विचार करणं आवश्यक आहे.

या बाबींचा विचार करा
कर्ज घेण्यासाठी कर्ज परतफेढीची क्षमता असणं हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही दर महिना किती हप्ता भरू शकता? त्या क्षमतेनुसार कर्ज मिळण्याची शक्यता असते. बँका तेच तपासतात. कर्ज देणारी आर्थिक संस्था किंवा बँक पात्रता पाहण्यासाठी तुमच्या उत्पन्नाची संपूर्ण माहिती मागतात. नोकरी करत असताल तर सॅलरी स्लिप पाहिली जाते. स्वंयरोजगार असेल तर उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागतो. भाडे उत्पन्न किंवा व्याजातून कमाई होत असेल तर बँक स्टेटमेंटमधून सिद्ध करावं लागतं. बँक स्टेटमेंट आणि सॅलरी स्लिपसोबतच कर भरणा यासंदर्भातील कागदपत्रांची नोंदी जरूरी आहे. तुमच्या उत्पन्नावर कर लागत नसतानाही आयटीआर भरणं कधीही चांगलं असतं. सिक्युर्ड कर्ज घर, कार किंवा सोनं तारण ठेऊन कर्ज सहज मिळते मात्र, अनसिक्युर्ड लोन उदाहरणार्थ पर्सनल लोन मिळण्यात अडचणी येतात. मागील कर्जाचा रेकॉर्ड उपलब्ध नसल्यास जास्त व्याज द्यावे लागते. जास्त व्याज दरानं कर्ज घेऊन वेळच्या वेळी हप्ते भरल्यास चांगला क्रेडिट स्कोअर तयार होतो. पुढील काळात तुम्ही कमी व्याजदरासाठी उर्वरित कर्ज इतर बँकेत ट्रान्सफर करू शकता. ज्या व्यक्ती सरकारी नोकरी करतात किंवा खासगी क्षेत्रात चांगला पगार असल्यास कर्ज मिळण्यात अडचणी येत नाहीत. अशाप्रकारे तुम्ही शून्य क्रेडिट स्कोअर असतानाही कर्ज मिळू शकता. त्यासाठी तुम्हाला उत्पन्न आणि कराचा लेखाजोखा चोख ठेवावा लागतो.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या