सध्या संपूर्ण देशात बागेश्वर धाम सरकार अर्थात पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची चर्चा सुरु आहे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गड़ा गावात असलेले बागेश्वर धाम सरकार हे आजकाल संपूर्ण भारतभर चर्चेचा विषय बनले आहे. दररोज लाखो भाविक आपल्या मनोकामना घेऊन बागेश्वर धाम सरकारमध्ये येत असल्याचे सांगितले जाते.
असे सांगितले जाते की, बागेश्वर धामचे मुख्य पुजारी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री भक्ताकडे पाहून त्यांच्या मनात काय चालले आहे ते सांगतात. त्यांचे दु:ख दूर करण्याचे मार्गही सांगतात. ते त्यांच्याकडे असणाऱ्या चिट्ठीवर पेनाने भक्ताला काही सांगण्याआधीच त्यांच्या समस्या लिहून ठेवत असतात. तसेच त्यांच्याकडे अशा काही सिद्धी आहेत की त्याच्या साहाय्याने ते काही चमत्कारही करतात असेही सांगितले जाते.
कोण आहेत हे चमत्कारी महाराज
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री असे यांचे नाव आहे. त्यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी छतरपूर जिल्ह्यातील गड़ा या छोट्याशा गावात झाला. त्यांचे बालपण त्यांच्या याच गावात गेल्याचे सांगण्यात येते. ते लहानपणापासूनच खूप सहनशील आणि दयाळू होते. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव राम करपाल गर्ग होते. त्यांच्या आईचे नाव सरोज गर्ग आहे. त्यांच्या आजोबांचे नाव भगवानदास गर्ग आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आजोबा चांगले विद्वान होते. ते निर्मोही आखाड्याशी संबंधित होते. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आजोबांना आपले गुरू मानत. त्यांनीच त्यांना रामायण आणि भगवद्गीतेचा अभ्यास करायला शिकवले.
पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे शिक्षण
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या शिक्षणाबत पाहिले तर एका रिपोर्टनुसार आठवीपर्यंत त्यांच्या गावातच शिक्षण घेतले. बारावीपर्यंतचे शिक्षण गंज येथून केले. बी.ए. केले. यानंतर ते समाजसेवा आणि मानवसेवेत गुंतले आणि त्यांनी शिक्षण सोडले. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे कुटुंब अत्यंत गरीब होते असे सांगितले जाते.
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी वयाच्या ९व्या वर्षापासून बालाजी सरकारची सेवा सुरू केली. त्यांच्या आधी आजोबा बालाजी सरकारचा दरबार चालवत असत. हनुमानाच्या कृपेने वयाच्या १२व्या वर्षापासून त्यांनी भगवत गीतेचे प्रवचन देण्यास सुरुवात केली. आणि ते बालाजींच्या दरबारात आध्यात्मिक साधना करत असत. या साधनेचा त्यांच्यावर असा प्रभाव पडला की बालाजींच्या कृपेने त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या असे सांगितले जात आहे.
आणि याच सिद्धीच्या जोरावर ते अनेक चमत्कारही करत असतात असे व्हिडीओ देखील सध्या व्हायरल झाले आहेत. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात एक तीर्थक्षेत्र आहे. जो बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखला जातो. बागेश्वर धाम हे “बाला जी” यांना समर्पित देवाचे मंदिर आहे. या प्रसिद्ध मंदिरात बागेश्वर धाम महाराजांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक येतात.
नागपूरमधील प्रकरण काय?
बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींची मागील आठवड्यात नागपूरमध्ये रामकथा आयोजित करण्यात आली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यावर म्हटले आहे की, धीरेंद्र शास्त्रींनी ‘रामकथेच्या नावाने’ अंधश्रद्धेचा खेळ केला आहे. असा त्यांनी यावर आरोप केला आहे. धीरेंद्र शास्त्रींनी किमान दहा लोकांवर चमत्कार सिद्ध केल्यास त्यांना ३० लाख देऊ, असे आव्हान देखील अंनिसकडून देण्यात आले आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, धर्मांतर रोखण्यासाठी अंतर्गत आणि ग्रामीण भागात नवीन विचारधारा आणण्यासाठी दर 2 महिन्यांनी 3 दिवसांची कथा आयोजित केली जात आहे.
अशा प्रकारे अनेक ख्रिश्चनांना जे हिंदू धर्म सोडून गेले होते त्यांना हिंदू धर्मात परत आणले आहे. भविष्यातही अशा अखंड कथांचे आयोजन केले जाईल. जो लोक सनातन धर्माच्या विरोधात काम करत आहेत त्यांना यामुळे त्रास होत आहे. सनातनी पूर्णपणे अहिंसक आहेत.’