Loan App अँप च्या माध्यमातून जलद गतीने (Fast Loan) लोन मिळवणे आता जीवघेणे ठरत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात या लोन अँपबद्दल महाराष्ट्र सायबर सेल कडे हजारो तक्रारी आल्या होत्या आता त्याची गंभीर दखल महाराष्ट्र सरकारच्या सायबर सेल ने घेतली आहे. नागरिकांच्या मिळालेल्या तक्रारी आणि त्यातील चौकशीनंतर महाराष्ट्र सायबर सेल ने हा निर्णय घेत अमेरिकेतील गुगलच्या मुख्य कार्यलयाला हे अँप गुगल प्लेस्टोर वरून काढून टाकण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
कर्जासाठी लोकांची फसवणूक व छळ करणारे हे ६९ अँप लवकरात लवकर हटवण्याचे आदेश सायबर सेल ने गूगल ला दिले आहेत.
ग्राहकांची मोबाईल मध्ये असलेली गोपनीय माहिती वापरून त्याचा गैरवापर केला जात असल्याचाही आरोप होत आहे. अशा अनेक तक्रारी कोरोनाच्या काळात सायबर सेल कडे आल्या होत्या. या अँपने होत असलेल्या छळामुळे काही लोकांनी आत्महत्या केल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्र सायबर सेलने यासंदर्भातील नोटीस गुगला पाठवली आहे. यामध्ये त्यांनी तब्बल 69 लोन अँप बंद करण्याचे आदेश गुगलला दिले आहेत.