spot_img
Tuesday, December 3, 2024
ताज्या बातम्याराहुल गांधींच्या कार्यालयावर हल्ला, 100 लोकांनी तोडफोड केली

राहुल गांधींच्या कार्यालयावर हल्ला, 100 लोकांनी तोडफोड केली

spot_img

ब्रेकिंग न्यूज : केरळमधील वायनाडमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी ( यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यादरम्यान राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्टच्या (सीपीआय-एम) विद्यार्थी संघटना एसएफआयच्या निषेध मोर्चाला हिंसक वळण लागले आणि विरोधकांच्या एका गटाने राहुल गांधींच्या कार्यालयाची तोडफोड केली. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे सुमारे 100 कार्यकर्ते निषेध मोर्चात सामील होते आणि त्यांनी कार्यालयात प्रवेश केला. पोलिसांनी सांगितले की, “सुमारे 80-100 कामगार होते. त्यापैकी आठ जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत.” केरळच्या डोंगराळ भागात जंगलांभोवती ‘बफर झोन’ निर्माण करण्याच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी हस्तक्षेप केला नाही, असा आरोप करत विद्यार्थी संघटनेने निषेध केला.

#WATCH | Kerala: Congress MP Rahul Gandhi's office in Wayanad vandalised.

Indian Youth Congress, in a tweet, alleges that "the goons held the flags of SFI" as they climbed the wall of Rahul Gandhi's Wayanad office and vandalised it. pic.twitter.com/GoCBdeHAwy
— ANI (@ANI) June 24, 2022

Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या