शिवसेना नेते संजय राऊत यांची तब्बल शंभर दिवसानंतर जेलमधून सुटका झाली. या सुटकेनंतर अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. दरम्यान यानंतर अनेक खळबळजनक दावे देखील करण्यात आले.
दरम्यान आता राऊत यांच्या सुटकेनंतर सामना दैनिकामधील अग्रलेखातून केंद्र सरकारसह तपास यंत्रणांवर आक्रमक शब्दांत आरोप केले आहे. ‘देशात कायद्याचे राज्य नाही. न्याययंत्रणेवर दबाव आहे व केंद्रीय यंत्रणा गुलाम बनल्या आहेत.
संजय राऊत प्रकरणात हे उघड झाले. विशेष न्यायालयाने हे सर्व परखडपणे समोर आणले,’ असा हल्लाबोल केलाय. तपास यंत्रणांवर टीका करत असताना सामना दैनिकातून भाजप नेत्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
‘मुंबई-महाराष्ट्रातील भाजपचे किमान ७ मंत्री, १५ आमदार-खासदार, भाजपास अर्थपुरवठा करणारे बिल्डर्स ‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरणात आत जातील असे गुन्हे त्यांच्या नावावर आहेत, पण ‘ईडी’ स्वतःच आरोपींची निवड करते
हे न्यायालयाचे म्हणणे अशावेळी सत्य ठरते,’ असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.