life insurance corporation of india जर कोणी एलआयसीचे शेअर्स घेतले Lic share असतील तर त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. एलआयसीच्या शेअर्स ने सर्वात मोठी तेजी नोंदवली. काल LIC चा शेअर जवळपास 6 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आहे.
LIC चा दर किती वाढला ते जाणून घ्या
LIC चा शेअर NSE (National Stock Exchange) मध्ये 5.89 टक्के किंवा 36.95 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे एलआयसीचा शेअर काल 664.65 रुपयांवर बंद झाला.
LIC च्या स्टॉकने (Lic Stock) त्याची किमान पातळी 658.30 रुपये आणि कमाल पातळी 684.90 रुपये केली आहे. या व्यतिरिक्त, पाहिले तर, NSE मध्ये LIC च्या स्टॉकची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 949.00 रुपये आहे आणि सर्वात कमी पातळी 588.00 रुपये आहे.
एलआयच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीचे कारण जाणून घ्या
एलआयसीच्या शेअरमध्ये वाढ होण्याची तीन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण असे की कंपनी बोनस शेअर्स ( Lic Share Bonus News ) आणि प्रचंड लाभांश देऊ शकते अशा बातम्या आल्या आहेत.
कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 15951 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. हा नफा गेल्या वर्षी याच तिमाहीत केवळ 1433 कोटी रुपये होता. त्याच वेळी, एलआयसीकडे व्यवस्थापनाखालील मालमत्ता 42.93 लाख कोटी रुपये झाली आहे. एका वर्षापूर्वी ते 39.50 लाख कोटी रुपये होते.
अशा स्थितीत कंपनी बोनस शेअर्स किंवा डिव्हिडंडच्या (Lic share Bonus and dividend) रूपात मोठा फायदा देऊ शकते, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना (Investor) आहे.