जे लोक अमरावती हून मुंबईला हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचायलाआले. ते आम्हाला हिंदुत्व शिकवतात, हा सर्वात मोठा विनोद आहे. बाहेरून आलेल्या अमरावतीच्या लोकांनी शिवसेनेसोबत पंगा घेऊन नये, अन्यथा महाराष्ट्रात राहणे मुश्किल करू’, असं म्हणत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला.
जेव्हा शिवसैनिक व हिंदू अयोध्येत शाहिद होत होते, तेव्हा हनुमान चालीसावाले कुठे गेले होते? चीनच्या सीमेवर चिनी सैनिक आले तेथे हनुमान चालीसा जाऊन म्हणावी. जेव्हा पर्यंत आमचे मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी नागपूरला येत राहील. संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुंबईत मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणणार असल्याचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्यावर कोरडे ओढले.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर आता भाजपकडूनही मविआ सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून राणा दाम्पत्याने यासंदर्भात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
यावेळी ते म्हणाले की, उद्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार आहोत. यावेळी ते म्हणाले की, मी मुंबईची मुलगी आहे. विदर्भाची सून आहे. त्यामुळे मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावर ठाम आहे, असा इशारा त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून शिवसेनेला दिला. राणा दाम्पत्य आज खाल येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. यानंतर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी मंजुनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेऊन मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कुठलेच काम करू नका, असं आवाहन करीत नोटीस बजावली.