spot_img
Thursday, November 21, 2024
व्यापार-उद्योगगुंतवणूकदारांचे लक्ष लागलेल्या देशातील सर्वात मोठ्या IPO ची प्रतिक्षा संपली 'LIC IPO'...

गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेल्या देशातील सर्वात मोठ्या IPO ची प्रतिक्षा संपली ‘LIC IPO’ आजपासून खुला, जाणून घ्या ब्रोकर्सचा सल्ला

spot_img

LIC IPO: गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेल्या देशातील सर्वात मोठा IPO असलेला एलआयसीचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. गुंतवणूकदारांना 9 मेपर्यंत बोली लावता येणार आहे.

देशातील सर्वात मोठा आयपीओ असणाऱ्या एलआयसीच्या समभाग विक्री योजनेला आज बुधवार ४ मे २०२२ पासून सुरुवात झाली आहे. भांडवली बाजारातील लाखात एक संधी असलेल्या या आयपीओमध्ये सबस्क्रिप्शन करावे कि नाही याबाबत देशातील आघाडीच्या असलेल्या ब्रोकर्सनी गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला दिला आहे.

रिलायन्स सिक्युरिटीज Reliance Securities : सबस्क्राईब करा
देशातील खासगी विमा कंपन्यांच्या शेअरच्या मूल्याच्या तुलनेत एलआयसीचे आयपीओसाठी निश्चित केलेलं मूल्य आकर्षक आहे. एलआयसीची अनेक उत्पादने असून १३ लाख ३० हजार एजंटचे महाकाय जाळे देशभरात विस्तारलेले आहे. एलआयसीचे नेतृत्व एक कुशल टीम करत आहे. त्यामुळे आयपीओला सबस्क्राईब करण्याचा सल्ला रिलायन्स सिक्युरिटीजने दिला आहे.

निर्मल बांग Nirmal Bang : सबस्क्राईब करा
आयुर्विमा उद्योगात एलआयसीचे निर्विवाद वर्चस्व आहे. याचशिवाय मार्जिन वाढवण्याची एलआयसीला संधी आहे. एलआयसीचे बाजारातील वर्चस्व आणि नवीन उत्पादने पाहता कंपनीमध्ये प्रचंड वृद्धीची क्षमता आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अँजेल वन Angel One : सबस्क्राईब करा
वैयक्तिक विमा व्यवसायात एलआयसीची मक्तेदारी कमी झालेली आहे. ही नक्कीच चिंतेची बाब आहे मात्र कंपनीचे मूल्यांकन या सर्व नकारात्मक बाजूबाबत वरचढ ठरेल. नजीकच्या काळात नाविन्यपूर्ण उत्पादने एलआयसीच्या नफ्यात हातभार लावतील, अशी अपेक्षा आहे. गुंतवणूक करण्याचा सल्ला आहे.

रेलिगेअर ब्रोकिंग Religare Broking : सबस्क्राईब करा
विम्याचा झालेला प्रसार एलआयसीची भक्कम वृद्धी करण्यास कारणीभूत ठरला आहे. आर्थिक वर्ष २०२१ ते २०३२ या काळात विमा उद्योगाचा वार्षिक स्तरावर १६ टक्के दराने वाढ अपेक्षित आहे. तसे झाल्यास यातील मोठा वाटा एलआयसीला मिळेल. तूर्त बाजारात एलआयसीचा कमी झालेला हिस्सा चिंता वाढवणारा आहे. गुंतवणूक करण्याचा सल्ला आहे.

चाॅईस ब्रोकिंग Choice Broking : सबस्क्राईब करा
३१ डिसेंबर २०२१ अखेर एलआयसीचा ६१.४ टक्के बाजार हिस्सा आहे. त्याशिवाय वैयक्तिक आणि ग्रुप विम्यामध्ये अनुक्रमे ७१.८ टक्के आणि ८८.८ टक्के हिस्सा आहे. यूलिप योजनांमध्ये मात्र एलआयसी कामगिरी खराब असून खासगी कंपन्यांपुढे एलआयसीची पिछेहाट झाली आहे. आयपीओला सबस्क्राईब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जीई कॅपिटल GE capital: सबस्क्राईब करा
एजंटबेस्ड माॅडेलमुळे एलआयसीचे बाजारात वर्चस्व आहे. मात्र खासगी कंपन्यांच्या तुलनेत एलआयसीची थोडी पिछेहाट झाली आहे. मात्र विस्तृत वितरणाचे जाळे आणि दुहेरी आकड्यात वृद्धीची अपेक्षा धरल्यास एलआयसी गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे.

जिओजित फायनान्शिअल Geojit Financial Services: सबस्क्राईब करा
बाजारातील हिस्सा कमी होण आणि खासगी क्षेत्राशी तीव्र स्पर्धा असली तरी मध्यम कालावधीसाठी आताचे एलआयसीचे मूल्यांकन सर्वात आकर्षक आहे. नजीकच्या काळात मोठ्या वृद्धीची अपेक्षा आहे. त्यामुळे सबस्क्राईबचा सल्ला देण्यात येत आहे.

याशिवाय मारवाडी फायनान्शिअल Marwadi Financial Services, स्वस्तिका इन्व्हेस्मार्ट Swastika Investsmart  आणि वेंचुरा कॅपिटल Ventura Capital यांनी एलआयसी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तर आयसीआयसीआय डारेक्ट या ब्रोकर्सने Brokers मात्र सावधगिरीचा इशारा दिला आहे.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या