spot_img
Thursday, November 21, 2024
ताज्या बातम्या४०-५० जणांच्या बंडखोरीने शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही, विजय उद्धव ठाकरेंचा होईल,...

४०-५० जणांच्या बंडखोरीने शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही, विजय उद्धव ठाकरेंचा होईल, पवारांकडून शिवसेनेचं कौतुक

spot_img

मुंबई – राज्यात सुरु असलेल्या बंडखोरांच्या सत्तासंघर्षात विजय सत्याचा होईल की प्रलोभनाचा होईल या प्रश्नावर विजय उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) होईल, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) दिले आहे. ४० ते ५० जणांच्या बंडखोरीने शिवसेनेवर परिणाम होणार नाही, शिवसेना (Shivsena) चिवट असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेचं संघटना म्हणून कौतुक केलं आहे. सरकार वाचेल की नाही, याबाबत बोलताना महाविकास आघाडी म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना अखेरच्या क्षणापर्यंत पाठिंबा देणार आहोत असे त्यांनी सांगितले. बंडखोर आमदार परत आल्यानंतर, त्यातले किती जण शिवसेनेसोबत असतील, त्यावर पुढचे सगळे ठरेल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. बंडखोर मंत्री आणि आमदारांवर आज-उद्यात कठोर कारवाी होईल असे संकेत त्यांनी दिले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या संबंधांपेक्षा आकर्षक प्रलोभन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदारांना सांभाळण्यात कमी पडले का, या प्रश्नावर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुक केले आहे. उद्धव ठाकरेंनी कामातून, संबंधांतून, पक्षाच्या चौकटीतून सगळ्यांशी संबंध ठेवले आहेत. याहीपेक्षा वेगळं, याहीपेक्षा आकर्षक प्रलोभन या बंडखोरांना देण्यात आले असण्याची शक्यता त्ायंनी वर्तवली आहे.

शिवसेनेचं केलं कौतुक

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं कौतुक केलं आहे. शिवसेना आणि शिवसैनिक हे बंड पचवणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेकडे शक्ती आणि संघटना आहे. संघटनेसाठी कष्ट घेण्याची पक्षाची तयारी आहे. पक्षातील ५० ते ६० जणांनी वेगळी भूमिका घेतली असली, तरी संघटनेवर परिणाम होणार नाही. असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागली तर निवडणुका होतील
राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागेल अशी स्थिती दिसत नाही. बंडखोर आमदारांना सत्ताबदल हवा असे शरद पवार म्हणाले. त्यासाठीच ते इक़डे तिकडे फिरत आहेत. अशा स्थितीत राष्ट्रपती राजवट लावली गेली तर कालावधी वाढेल आणि अशा स्थितीत राष्ट्रपती राजवट लागली तर पुढे निवडणुका होतील, असे पवार म्हणाले.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या