spot_img
Sunday, December 22, 2024
ताज्या बातम्याShivsena : शिवसेना फुटण्याची शक्यता? मंत्री एकनाथ शिंदे समर्थक 13 आमदार नॉटरिचेबल

Shivsena : शिवसेना फुटण्याची शक्यता? मंत्री एकनाथ शिंदे समर्थक 13 आमदार नॉटरिचेबल

spot_img

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यातील वाद आता टोकाला पोहचला असून तो आता समोर येत आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जाणारे शिवसेनेतील 13 आमदार नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. विधानपरिषेदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस बाहेर येत असल्याचे वृत्त आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता आणखी वाढली आहे. मध्यरात्री वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली.

सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. ‘एबीपी माझा’च्या प्रतिनिधींनी देखील काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही फोन नॉटरिचेबल लागला.

आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई आणि आसपसच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आज पुन्हा बैठक

मध्यरात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आमदारांची आज पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजता ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत किती आमदार उपस्थित राहतात यावर महाविकास आघाडीचं भविष्य अवलंबून आहे. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या