spot_img
Sunday, December 22, 2024
टेक्नोलाॅजीGoogle ने Play Store मधून हटवले 'हे' १३ धोकादायक Apps तुमच्या फोनमध्ये...

Google ने Play Store मधून हटवले ‘हे’ १३ धोकादायक Apps तुमच्या फोनमध्ये तर नाही, पाहा लिस्ट

spot_img

Removed Apps: Google प्ले स्टोअरवरून काही धोकादायक मोबाइल Apps काढून टाकण्यात आले आहेत, हे Apps युजर्सना नुकसान पोहचवत होते. तुम्हीही हे अॅप्स वापरत असाल तर लगेच तुमच्या मोबाइलमधून काढून टाका.

नवी दिल्ली: Phone Apps: Google वेळोवेळी अँड्रॉइड Apps तपासत असते . तसेच, कोणतेही अॅप धोकादायक आढळल्यास ते App थेट Google प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात येते. गुगलने अलीकडेच २० दशलक्षाहून अधिक डाउनलोड असलेले १३ असे मोबाइल Apps Play Store वरून काढून टाकले आहेत. हे अॅप्स स्मार्टफोनची बॅटरी आणि सामान्यपेक्षा जास्त मोबाइल डेटा वापरत होते. तुम्हीही खाली नमूद केलेले अॅप वापरत असल्यास, ते तुमच्या फोनवरून ताबडतोब अनइंस्टॉल करा.

मेमो कॅलेंडर: हे एक कॅलेंडर नोट App आहे. ज्यात तुम्ही नोट्स घेऊ शकता आणि त्यांना वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागू शकता. एवढेच नाही तर, तुम्ही नोट्स इतर लोकांपासून संरक्षित करण्यासाठी पासवर्ड लॉक देखील लागू करू शकता.

फ्लॅशलाईट प्लस : हे App क्लिन यूजर इंटरफेससह येते आणि कोणत्याही प्रकारे कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाही.

इंग्रजी कोरियन शब्दकोश: ही एक पॉकेट डिक्शनरी आहे, जी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही वापरता येते .

बुसान बस: हे App बुसानमध्ये राहणाऱ्या लोकांना बस मार्गांची माहिती देते.

स्मार्ट करन्सी कन्व्हर्टर: या App च्या नावाप्रमाणे, हे चलन मूल्यांमध्ये रूपांतरित करण्यासाठी काम करते.

क्विक नोट्स: हे App वापरण्यास अतिशय सोपे आणि नोट्स वापरण्यास सोपे आहे, या App द्वारे आपण सहजपणे आपल्या नोट्स ऍक्सेस करू शकता.

EzDica: हा टाइमस्टॅम्प कॅमेरा आणि डेट स्टॅम्प कॅमेरा अॅप आहे.

जॉयकोड: हे अॅप QR कोड स्कॅनर, बारकोड रीडर इत्यादी अनेक वैशिष्ट्ये देते.

इन्टाग्राम प्रोफाइल डाउनलोडर: या App च्या मदतीने, युजर्स Instagram फोटो, व्हिडिओ, स्टोरी आणि पोस्ट डाउनलोड आणि सेव्ह करू शकतात.

इमेज व्हॉल्ट : या अॅपच्या मदतीने, युजर्स व्हॉल्ट अॅपच्या मदतीने त्यांचे वैयक्तिक फोटो इतरांच्या नजरेपासून वाचवू शकतात.

ईझ नोट्स: हे एक नोट्स ऑर्गनायझर आहे. जे हँड्स-फ्री नोट्स कॅप्चर करण्याव्यतिरिक्त इतर अनेक उपयुक्त वैशिष्ट्ये ऑफर करते.

SmartTask: या अॅपच्या मदतीने युजर्स त्यांचे काम अधिक चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतात. हे अॅप तुम्हाला तुमच्या कामाचा मागोवा घेण्यासही मदत करते.

हाय स्पीड कॅमेरा: हे App युजर्सना अनेक फोटो पटकन कॅप्चर करण्यास अनुमती देते. तसेच, स्थिर आणि स्पष्ट फोटो काढण्यास सक्षम आहे.

       Share News

व्हॉट्सअ‍ॅपवर अपडेट मिळवण्यासाठी

MahaToday आता व्हॉट्सअ‍ॅपवर आहे. MahaToday जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा.

जाहिरात

आणखी महत्वाच्या बातम्या

जाहिरात

अर्थकारण

आणखी महत्वाच्या बातम्या